Videocon Group चेअरमन वेणुगोपाल धूत (Venugopal Dhoo) यांनी दिलेल्या माहितीनंतर देशातील बँकींग, उद्योग आणि आर्थिक क्षेत्रात एकाच वेळी खळबळ उडाली आहे. वेणुगोपाल धूत यांनी म्हटले आहे की, त्यांच्या कंपनीवर सुमारे 90 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. गेल्या वर्षी कर्जाचा परतावा करताना डिफॉल्ट नंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया (SBI)ने एनसीएएलटी (NCLT)कडे तक्रार केली होती. दिवाळखोरी कायद्यानुसार कंपनीच्या संचालक मंडळास (कंपनी बोर्ड) निलंबित करण्यात आले आहे. तर, दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी रिजोल्यूशन प्रोफेशनल नियूक्त करण्यात आला आहे.
तब्बल 54 बँकांना तडाखा
Videocon Group मुळे 54 बँकांचे आर्थिक गणित गडबडण्याची शक्यता आहे. समूहाच्या दोन कंपन्या Videocon इंडस्ट्रीज लिमिटेड (VIL) आणि व्हिडिओकॉन टेलीकम्यूनिकेशन लिमिटेड (VTL) कर्जाच्या बोजाखाली दबून गेली आहे. Videocon Group ला कर्ज देणाऱ्यांमध्ये एकूण 54 कर्जदात्यांपैकी बँकांचा आकडा 34 इतका आहे. VIL आणि VTL वर अनुक्रमे 59,451 कोटी रुपये आणि 26,673.81 कोटी रुपये इतके कर्ज आहे. एकूण कर्जदात्यांपैकी व्हाआयएलला कर्ज कर्ज देणाऱ्या बँकांचा आकडा 34 आहे. या बँकांनी व्हीआयएल कडे सर्वाधीत रक्कम गुंतवली आहे. त्यातही SBI कंपनीची सर्वाधिक रक्कम ही VIL कडे कर्जरुपात गुंतली आहे. एसबीआयची ही रक्कम तब्बल 11,175.25 कोटी रुपये असल्याचे समजते. तर, VTL कडे या बँकेचे (SBI) तब्बल 4,605.15 कोटी रुपये गुंतले आहेत.
ऑपरेशनल क्रेडिटर्सचेही कोट्यवधी रुपये Videocon Group मध्ये गुंतले
दरम्यान, बँकेच्या कर्जाशिवाय 731 सप्लायर्स (ऑपरेशनल क्रेडिटर्स) यांचेही पैसे Videocon Group कडे मोठ्या प्रमाणावर गुंतले आहेत. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, Videocon Group कडे सप्लायर्सचे सुमारे 3,111 कोटी 79 लाख 71 हजार 29 कोटी रुपये गुंतले आहेत. ही रक्कम VIL कंपनीकडे गुंतल्याचे समजते. तर, VTL कंपनीकडे सप्लायर्सचे सुमारे 1266 कोटी 99 लाख 78 हजार 507 रुपये गुंतल्याचे समजते. (हेही वाचा, ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी ख्रिस्तीयन मिशेलने उघड केले काँग्रेसच्या बड्या नेत्याचे नाव: ईडी)
दरम्यान, आयसीआयसीआय बँकेच्या एका वादग्रस्त प्रकरणात दिल्ली पोलिसांनी एक आरोपपत्र दाखल केले आहे. यात वेणुगोपाल धूत यांचेही नाव आहे. या प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावली तर ती 7 वर्षांपर्यंतची असू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.