helicopter crash near Ganganani in Uttarkashi | X @ANI

उत्तराखंड (Uttarakhand) मध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात Ganganani भागात एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. दरम्यान हे पर्यटक होते. हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही परंतू या घटनेनंतर तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि रिलीफ टीम दाखल झाली असून जखमींना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. Garhwal Divisional Commissioner Vinay Shankar Pandey यांनी या दुर्घटनेची पुष्टी केली आहे.

हेलिकॉप्टर क्रॅशच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी देखील 'एसडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकांनी मदत आणि बचाव कार्यासाठी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. मी प्रशासनाला जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आणि अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.' अशी माहिती X पोस्ट द्वारा दिली आहे.

उत्तराखंड मध्ये प्रवासी हेलिकॉप्टर कोसळले

हेलिकॉप्टर डेहराडूनहून हर्सिल हेलिपॅडकडे उड्डाण करत होते. तिथून पर्यटकांना रस्त्याने गंगनानीपर्यंत सुमारे 30 किमी अंतर कापायचे होते. हेलिकॉप्टर मध्ये 6 प्रवासी आणि कॅप्टन होते.