उत्तर प्रदेश: धक्कादायक! सुनेचा बळी देण्यासाठी दिराच्या सांगण्यावरुन नणंदेने केले 101 वार
Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तर तांत्रिक दिर, नणंद आणि नणंदेच्या नवऱ्याने कथित रुपात सुनेचा बळी देण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार पीडित महिलेच्या अंगावर 101 वेळा चाकू वार केल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर 300 टाके टाकले आहेत. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून नणंदेला अटक करण्यात आली आहे. पण तांत्रिक दिर आणि नणंदेच्या नवऱ्याने या प्रकारानंतर पळ काढला आहे.

बरेली येथील वरिष्ठ पोलिसांनी असे सांगितले आहे की, आरोपी नणंद असामान्य सारखी वागायची. तिने पीडित महिलेवर चाकूने वार केल्याची कबुली दिली आहे. एवढेच नाही तर महिलेच्या चेहऱ्यावर पूर्णपणे टाके टाकण्यात आले आहेत. आरोपी नणंदेची पाठवणी तुरुंगात करण्यात आली आहे. मात्र अन्य आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.(झांसी: भिंत कोसळून 5 कामगारांचा जागीच मृत्यू, 7 जण गंभीर जखमी)

महिलेचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी सुद्धा आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पीडित महिलेचे सासरे आजारी होते. त्यामुळे तांत्रिक जेठ याने अन्य दोघांसोबत तंत्रविद्येच्या सहाय्याने सासऱ्यांना बरे करण्यासाठी महिलेचा बळी देण्याचा कट रचला. तर रविवारी रात्री महिलेचा बळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने तिच्यावर 101 वेळा चाकूने वार केले. मात्र या सर्व वेदना सहन करत पीडित महिलेने त्यांच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.