Uttar Pradesh: वरुण गांधी योगी सरकारविरोधात आक्रमक, ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ, पोस्ट मधून निशाणा
Varun Gandhi | (Photo Credits: Facebook)

उत्तर प्रदेश भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी आपल्याच पक्षावर आणि योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शेतकरी आंदोलनाशी संबंधित मुद्द्यांवरुन केंद्रातील एनडीए सरकार आणि उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था यांवर जोरदार हल्लाबोल केला हरोता. वरुन गांधी योगी आदित्यनाथ सरकार (UP Government) वर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वरुन गांधी यांनी पुन्हा एकदा योगी सरकार आणि यूपी पोलिसांवर जोरदार निशाणा साधला आहे.

वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक पोलीस कडेवर लहान बाळ असलेल्या व्यक्तीला काठीने मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत वरुन गांधी म्हणतात, सशक्त कानून व्यवस्था तीच आहे जी कमजोरमधीलही कमोजर व्यक्तीला न्याय देऊ शकेल. न्याय मागणाऱ्या व्यक्तीवर इतक्या वाईट पद्धतीने लाठीमार करणे हे अत्यंत दु:ख कारक आहे. सशक्त कायदेव्यवस्था तीच ज्यात गुन्हेगार पोलिसांना घाबरतील. न्याय मागणारे पोलिसांना घाबरणार नाहीत. (हेही वाचा, Varun Gandhi attacks on BJP: 'शेतकऱ्याचा छळ बंद करा!' वरुण गांधी यांचा भाजपवर निशाणा; अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणाचा व्हिडिओ केला ट्विट)

वरुन गांधी यांनी ट्विटरवर शेअर केलेला फोटो सोशल मीडियातही व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील देहात परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओत एक पोलीस कडेवर लहान बाळ असलेल्या व्यक्तीला काठीने मारताना दिसत आहे. हा व्यक्ती पोलिसाला विनंती करतो आहे की, कडेवरील बाळाला लागेल. पण पोलिस ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. पोलिस मारहाण करत असलेले पाहून कडेवरील बाळही रडत असल्याचा आवाज येतो आहे.

ट्विट

दरम्यान, प्रसारमाध्यांनी दिलेली माहिती अशी की, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कानपूर देहातचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम चौरासिया यांनी काही लोक घटनास्थळावर कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत होते. रुग्णालयातील ओपीडी बंद करत होते. रुग्णांना घाबरवत होते. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर केला.