उत्तर प्रदेश: जमिनीच्या वादातून 9 जणांची हत्या, तर 14 जण जखमी
फोटो सौजन्य- फाइल इमेज

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) आज (17 जुलै) सोनभद्र जिल्ह्यात जमिनीच्या वादातून 9 जणांची हत्या करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी 14 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपाचार सुरु आहेत. दोन गटामधील वाद एवढा विकोपाला गेली की, मारहाण करत हत्या करण्यात आली.

या प्रकाराची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर उपचार सुरु असून अनेकजणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. 100 एकर जमीनीच्या वादावरुन हत्या करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये चार महिलांसह सहा पुरुषांचा समावेश आहे.

(धक्कादायक! ठाकोर समाजात अविवाहित मुलींनी मोबाईल वापरल्यास दीड लाखाचा दंड; जात पंचायतीचा निर्णय)

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 100 एकर जमिनीचा व्यवहार दोन वर्षांपूर्वी करण्यात आला होता. तर ज्या व्यक्तीने जमीन खरेदी केली आहे त्याने ती ताब्यात घेण्यासाठी गेला असता त्याला ग्रामस्थांनी विरोध केला. हे प्रकरण एवढे मोठे झाले की, गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना आतापर्यंत अटक केली आहे.