कानपूर (Kanpur) येथील कल्याणपूर (Kalyanpur) परिसरातून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. या घटनेनुसार, आरोपीने धारधार शस्त्राने चक्क एका महिलेचे नाक (Nose) कापले आहे. आर्थिक वादातून (Financial Dispute) आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती आहे. पीडितेची ओळख रेखा असल्याची प्राथमिक माहिती आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेने पोलिसा तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार संबंधित महिलेचा एका रुग्णालय परिसरात चाहाचे छोटे दुकान आहे. रुग्णालयाच्या कॅंटीन संचालक असलेल्या विनोद नामक व्यक्तीने संबंधित महिलेला हे दुकान हटविण्यास सांगितले. यावरुन पीडित महिला आणि विनोद यांच्यात काही किरकोळ वाद झाला. या वादाला आर्थिक पार्श्वभूमी होती.
दरम्यान, आरोपी विनोद याने दावा केला की रेखा हिच्या चहाच्या दुकानामुळे कॅन्टीनच्या व्यवसायारव प्रतिकूल परिणाम होतो. त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे आपण तिला हे दुकान हटविण्यास सांगितले. आपण तिला अत्यत सभ्य भाषेत दुकान हटविण्यास सांगितले. परंतू, तिने विरोध केला.
पीडितेने पोलिसांना सांगितलेकी, विनोद आपणास मारहाण करताना आपण आरडाओरडा केला. या वेळी त्याने मला उचलून जमीनीवर आपटले आणि जवळचा चाकू काढून त्याने माझे नाक कापले. तसेच, यापुढे चहाचे दुकान इथे लावशील तर त्याचे परिणाम गंभीर होतील अशी धमकी दिल्याचा आरोपही पीडितेने केला आहे.
दरम्यान, कल्याणपूर ठाणे प्रभारी वीर सिंह यांनी म्हटले की, रेखा आणि विनोद यांच्यात आर्थिक वाद असल्याची प्राथमिक माहिती आहे. दोघांकडूनही परस्पर तक्रारी दाखल झाल्या आहेत. तपास सुरु आहे.