Police seized huge quantity of weapons and liquor from Uttar Pradesh (Photo Credits: ANI/Twitter)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बुलंदशहर (Bulandshahr) येथे पोलिसांनी काल (सोमवार, 15 एप्रिल) दारुसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला आहे. नेहमीच्या तपासणी दरम्यान हा शस्त्रसाठा पोलिसांना आढळून आला. एसएसपी एन कोलांची (SSP N Kolanchi) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तपासणीत 405 अवैध शस्त्र, 739 काडतूसे, 2 कोटी रुपयांची दारू आणि 1.5 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.

ANI ट्विट:

निवडणुका सुरु असताना हिंसाचाराचा मोठा कट उधळून लावण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना यश आले असून सुरक्षिततेसाठी पोलिस अशा प्रकारच्या तपासण्या सुरुच ठेवतील, असेही सांगण्यात आले आहे.