Uttar Pradesh: उष्णता आणि भयावह दुष्काळ अशा भयानक कात्रीत सापडलेला एक शेतकरी भलताच संतप्त झाला आहे. मध्य प्रदेश राज्यातील या शेतकऱ्याने थेट भगवान इंद्रदेव यांच्याशीच पंगा घेतला आहे. विशेष म्हणजे वेळेत पुरेसा पाऊस नपडल्याबद्दल या शेतकऱ्याने इंद्रदेवाविरुद्ध (Complaint Against Indra Dev) तक्रारही केली आहे. सुमित कुमार यादव असे या शेतकऱ्याचे नाव आहे. तो करनैलगंज तालुका हद्दीत येणाऱ्या गोंडा (Gonda News) जिल्ह्यातील रहिवासी आहे. करनैलगंज तालुक्याच्या तहसीलदारांनीही या घटनेची नोंद घेतली असून, ती तक्रार जिल्हा प्रशासनाकडे पाठवली आहे.

सुमित कुमार यादव याच्या तक्रारीनंतर पाऊस पडणार की नाही हे माहीत नाही. परंतू, जिल्हाधिकाऱ्यांकडे ही तक्रार प्राप्त होता त्यांनी तहसीलदारांच्या चौकशीचे मात्र आदेश दिले आहेत. गोंडा जिल्ह्यातील करनौलगंज तालुक्यात शनिवाैरी संपूर्ण समाधान दिवस (Sampurna Samadhan Divas) आयोजित करण्यात आला होता. या वेळी विकासखंड कटरा बाजारा येथील कौडिया पोलीस ठाणे हद्दीतील रिवासी सुमित यादव यांनी तक्रार अर्ज दाखल केला. यात त्यांनी म्हटले आहे की, पाठिमागील काही दिवसांपासून पाणी (आकाशातून) पडत नाही. त्यामुळे जनता त्रस्त आहे. त्याचा सृष्टीतील जीव-जंतू, प्राणी आणि मानवावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे घरात असलेली मुले आणि महिलाही त्रस्त आहेत. त्यामुळे या गंभीर विषयावर आपण उपाययोजना करावी.

 

 

सुमित यादव यांचे तक्रारपत्र प्राप्त होताच तसहसीलदारांनी त्यावर मोहोर उमठवली आणि त्यांनी कारवाईसाठी हे पत्र पुढे पाठवले. हे पत्र जेव्हा व्हायरल झाले तेव्हा ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचले. जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, पत्र न वाचताच पुढे कसे काय पाठविण्यात आले असा सवालही विचारण्यात आला आहे. आता या पत्राला तहसीलदार काय उत्तर देतात याबाबत उत्सुकता आहे.