उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) उपचारावेळी एका महिलेच्या तोंडात अचानक स्फोट झाल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महिलेने विष प्यायल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तर उपचार करण्यासाठी महिलेच्या तोंडात सक्शन पाईप टाकण्यात आला. त्यावेळी अचानक उपचार सुरु असतानाच स्फोट झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार डॉक्टरांच्या मते या महिलेने सल्फुरिक अॅसिड प्यायले होते. त्यामुळे सक्शन पाईपचा संपर्क ऑक्सिजन सोबत आल्याने स्फोट झाल्याची शक्यता वर्तवली आहे.
या प्रकरणी महिलेच्या तोंडात स्फोट नेमका कशामुळे झाला याचा अधिक तपास केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. तसेच उपचारावेळी महिलेच्या तोंडात स्फोट झाल्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.