उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या मंत्रिमंडळाती एक मंत्री बाबूराम निषाद (Baburam Nishad) यांच्यावर त्यांच्या पत्नी नीतू निषाद गंभीर आरोप केले आहेत. नितू निषाद (Neetu Nishad) या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओद्वारे आपली बाजू मांडत आहेत. या व्हिडिओमध्ये नीतू निषाद यांनी पती बाबूराम निषाद यांच्यावर आरोप केला आहे की, गेली 14 वर्षे त्यांना पतीकडून मारहाण केली जात आहे. तसेच, तोंडात बंदुक कोंबून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तसेच, वारंवार घटस्फोटासाठी जबरदस्ती केली जात असल्याचा आरोपही नीतू निषाद यांनी पती बाबूराम निषाद यांच्यावर केला आहे. पतीच्या क्रूरकृत्याचे आपल्याकडे खूप पुरावे असल्याचा दावाही नीतू निषाद यांनी केला आहे.
नीतू निषाद यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर केला असून, या व्हिडिओसोबत पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'बाबूराम निषाद एवं वित्त विकास महामंडळाचे अध्यक्ष यांची खरी कहाणी, आज मी आणि माझी मुलं दुख: कथन करत आहोत. आज मला कळत आहे की, शासन आणि प्रशासन हे मंत्री बाबू राम यांची कशाप्रकारे मदत करत आहेत. मला समाजाच अपमानीत केले जात आहे. मी एक महिला आहे म्हणूनच माझ्यावर चुकीचे आरोप लाऊन माझी प्रतिमा मलीन केली जात आहे.' फेसबुक पोस्टसोबत नीतून निषाद यांनी एक ऑडिओ क्लिपही शेअर केली आहे. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (हेही वाचा, माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीला अटक: पुढील सुनावणी 26 सप्टेंबरला)
नीतू निषाद फेसबुक पोस्ट
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्या निवासी असलेल्या बाबू राम निषाद यांनी कौटुंबिक न्यायालयात पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायालयाने येत्या 30 ऑक्टोबर रोजी सुणवणी ठेवली आहे. दरम्यान, बाबूराम निषाद यांच्या वकिलाने नीतू निषाद यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे की, 'त्यांची पत्नी (नीतू निषाद) ही त्यांच्यावर (बाबूराम निषाद) यांच्यावर छळाचा आरोप वारंवार करत आली आहे, त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेऊन पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे'.