Covid-19 Special Train चा तस्करीसाठी वापर; साडेचार लाख सिगारेट्स जप्त, जुना दिल्ली रेल्वे स्थानकात कारवाई
Cigarette (Representational image | Photo Credits: Getty Images)

नुकतेच पीपीई किट (PPE Kit) घालून सातारा जिल्ह्यात सराफाच्या दुकानात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. कोविड-19 विशेष गाड्या (Covid-19 Special Train) चा उपयोग तस्करी  (Smuggling) साठी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवर (Old Delhi Railway Station) छापा टाकल्यानंतर दिल्ली कस्टमच्या निवारक पथकाने हा मोठा खुलासा केला आहे. जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकातून कस्टम टीमने लाखो रुपयांचे विदेशी सिगारेट (Foreign Cigarettes) जप्त केले आहे. आता कोट्यवधी रुपयांची ही विदेशी सिगारेट दिल्लीत कोणाकडे पोहोचवली जात होती, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तसेच या तस्करीच्या रॅकेटमध्ये अजून कोणते लोक सामील आहेत, याचीही चौकशी होत आहे. कस्टमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पथकाला गुप्तचर यंत्रणांकडून कोविड स्पेशल ट्रेनमधून सतत तस्करीचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळाली होती. वाराणसीहून येणाऱ्या कोविड स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून तस्करीची मोठी कंसाइनमेंट, जुनी दिल्ली रेल्वे स्थानक गाठणार असल्याची माहितीही गुप्तचर इनपुटकडून मिळाली होती.  माहितीच्या आधारे दिल्ली कस्टमच्या प्रिव्हेन्टिव्ह टीमने जुने दिल्ली रेल्वे स्थानकात सापळा रचला. वाराणसीहून येणारी कोविड स्पेशल ट्रेन स्थानकावर पोहोचताच कस्टम टीमने आपली कारवाई सुरू केली. (हेही वाचा: पुणे कस्टम विभागातील अधिकाऱ्यांकडून चरस, गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक; तब्बल 1.79 कोटींचा माल जप्त)

या ट्रेनने दिल्लीत पोहोचलेले प्रत्येक सामान आणि पार्सल टीमने तपासले. या शोध दरम्यान, कस्टम टीमने 15 कार्टनमधून परदेशी सिगारेट जप्त केल्या. या सर्व सिगारेट पॅरिस ब्रँडच्या (Paris Brand Cigarette) आहेत. रेल्वे स्थानकातून जप्त करण्यात आलेल्या या परदेशी सिगारेट्सची अंदाजे किंमत 40 लाख इतकी आहे. कस्टमने सर्व सिगारेट हस्तगत केल्या आहेत आणि COTPA ACT 2003 आणि कायदेशीर मेट्रोलॉजी कायदा 2009 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता या विदेशी सिगारेट वाराणसीत कशा आल्या आणि ते दिल्लीमध्ये कोणाकडे जात होत्या, याचा शोध चालू आहे. या सिगारेट्स शेजारच्या बांगलादेशहून देशात तस्करी केल्याचा संशय आहे.