अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांचा निस्सीम भक्त बुसा कृष्णा (Bussa Krishna - 38) याचे रविवारी दुपारी हार्ट अटॅकने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, मेडक जिल्ह्यातील टूप्रान भागात आपल्या काकांच्या घरी चहा घेत असताना तो कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कृष्णा ट्रम्प यांचा फार मोठा भक्त होता. गेल्या वर्षी त्याने तेलंगणातील जानगाव जिल्ह्यात, कोन्ने गावातील बचनपेट (Bachannapet) ब्लॉकमधील आपल्या घरात सहा फूट उंच ट्रम्प यांचा पुतळा उभारला होता.
बुसा कृष्णाने आपल्या घरात ट्रंप यांचे मंदिरही (Donald Trump Temple) उभारले आहे. बुसा कृष्णा गेली अनेक वर्षे डोनाल्ड ट्रंप यांना देव मानून त्यांची पूजा-उपासना करीत आहे. त्याची ट्रंपवरील भक्ती पाहून आजूबाजूचे लोक त्याला 'ट्रम्प कृष्णा' म्हणून संबोधत होते. या महिन्याच्या सुरुवातीस, मिररशी बोलताना त्याने सांगितले की, आगामी निवडणुकीत ट्रम्प यांच्या विजयासाठी आपण प्रार्थना करीत आहोत. ट्रम्प यांना कोविड-19 ची लागण झाल्याचे समजल्यानंतर तो फारच अस्वस्थ झाले होता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करणारा व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला होता. (हेही वाचा: Coronavirus वर मात केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी दिले पहिले सार्वजनिक भाषण)
एएनआय ट्वीट -
Telangana: Bussa Krishna, who had installed a 6-feet statue of US President Donald Trump last year and worshipped him, passes away due to cardiac arrest, in Medak. (In file pics - Bussa Krishna) pic.twitter.com/ucNm4pTHfj
— ANI (@ANI) October 11, 2020
चार वर्षापूर्वी जेव्हा ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले, तेव्हा ते आपल्या स्वप्नात आले होते. त्या दिवसापासून आपण त्यांच्या उपासनेला सुरुवात केली असे कृष्णा म्हणत असे. हे जाणूनही तुम्हाला आश्चर्य वाटेल की, कृष्णा दर शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास ठेवत होता. डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव त्याच्या घराच्या प्रत्येक भिंतींवर लिहिलेले आहे. शाळा सोडल्यानंतर कृष्णा शेतीमध्ये रमला होता. त्याला जागतिक राजकारणाचे चांगलेच ज्ञान होते. ट्रम्प यांनी पुन्हा जिंकून चीनला सामोरे जावे, अशी त्याची इच्छा होती. कृष्णा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समर्थक होता.