Urmila Matondkar's speech on CAA. (Photo Credits: ANI)

शिवसेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर  (Urmila Matondkar) यांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणी उर्मिला मातोंडकर यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उर्मिला मातोंडकर या झारखंड मधील एका कार्यक्रमाला उपस्थितीत होत्या. त्यावेळी हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाची परिस्थितीत नियमांचे पालन केले जात आहे. मात्र आता कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन केल्याची बाब आता समोर आली आहे.(Development of Maharashtra: महाराष्ट्राच्या विकासात शिवसैनिकांचा अडथळा? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र) 

पलामू जिल्ह्यात एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी उर्मिला मातोंडकर यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी कोरोनाच्या नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप लावण्यात येत आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता उर्मिला मातोंडकर यांची चौकशी होणार का असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.

मेदिनीनगर येथे हॉटेलच्या उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबद्दल जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या संदर्भात तपास करतील असे सांगितले जात आहे. दुसऱ्या बाजूला हॉटेलने त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी असे म्हटले आहे की, उद्घाटनावेळी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते.(Milind Narvekar: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना धमकी) 

तसेच उर्मिला मातोंडकर यांनी उद्घाटना कार्यक्रमासाठी फक्त एकच तास देऊ करेन असे ही म्हटले होते. त्याचसोबत कार्यक्रमात सहभागी झालेल्या उपस्थितांशी उर्मिला मातोंडकर यांनी बंद खोलीतून संवाद साधल्याचे हॉटेल प्रशासनाकडून सांगितले जात आहे. उद्घाटनानंतर त्या रांचीहून मुंबईत परतल्याचे ही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.