Sonia Gandhi (PC- Facebook)

काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा आणि विद्यमान युपीए अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi Hospitalised) यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे. त्यांना ब्रॉंकायटीसचा (Bronchitis) त्रास वाढला आहे. त्यामुळे त्या दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालयात (Sir Gangaram Hospital, Delhi) दाखल झाल्या आहेत. त्यांच्यावर डॉक्टरंचे एक पथक लक्ष ठेऊन आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून वैद्यकीय तपासणी केली जात असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. सोनिया गांधी सध्या 76 वर्षांच्या आहेत. सोनिया गांधी यांना कालच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

दिल्ली येथीलसर गंगाराम हॉस्पिटल ट्रस्ट सोसायटीचे अध्यक्ष डीएस राणा म्हणाले की, सोनिया गांधी यांना काहीसा ताप जाणवतो आहे. त्यामुळे त्यांना चेस्ट मेडिसिन विभागाचे वरिष्ठ सल्लागार अरुप बसू आणि त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलने सांगितले की सोनिया गांधी निरीक्षणाखाली आहेत. डॉक्टरांकडून त्यांची तपासणी सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. (हेही वाचा, Sonia Gandhi On Political Retirement: मी कधीही निवृत्त झाले नाही आणि कधी होणारही नाही; राजकारणातील निवृत्तीच्या बातम्यांदरम्यान सोनिया गांधींचे महत्त्वपूर्ण विधान)

ट्विट

सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्याची या वर्षातील दुसरी वेळ आहे. या आधी सोनिया गांधी जानेवारी2023 मध्ये रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. तेव्हा त्यांना श्वसनाशी संबंधीत त्रास झाला होता. त्यांच्यावर कोरोनावरील उपचारही करण्यात आले आहेत.ल