आज जगात जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात महिलांची आघाडी असल्याचे दिसत आहे, परंतु दुसरीकडे मुल जन्माला घालण्यासाठी महिलांवर दबाव टाकला जात आहे, त्यातही एखाद्या महिलेला मुल होत नसेल तर तिला मोठ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) गर्भधारणेसंबंधी एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका महिलेने सासरच्या मंडळींना ती प्रेग्नंट असल्याची खोटी माहिती दिली.
इतकेच नाही तर, पोटदुखीच्या तक्रारीनंतर महिलेने 'गर्भधारणेच्या' सहाव्या महिन्यात आरोग्य केंद्रात जाऊन दावा केला की तिने प्रीमॅच्युअर बाळाला जन्म दिला आहे, जी एक प्लास्टिकची बाहुली होती. उत्तर प्रदेशातील इटावा (Etawah) येथे ही घटना घडली आहे. सीमा देवी (38) आणि सत्येंद्र कुमार यांच्या लग्नाला 18 वर्षे झाली आहेत. परंतु अजूनही जोडप्याला मुल नसल्याने घरची मंडळी, कुटुंबीय, नातेवाईक सतत सीमाला टोमणे मारत होते. सतत तिला घालून पाडून बोलत होते.
या मानसिक त्रालासा कंटाळून तिने ती गर्भवती असल्याची खोटी बतावणी केली. त्यानंतर सहा महिन्यांनी पोटदुखीची तक्रार घेऊन ती आरोग्य केंद्रात गेली. तिथे तिने डॉक्टरांना सांगितले की, तिने वेळेआधीच मुलाला जन्म दिला आहे. त्याठिकाणी सीएचसीच्या डॉक्टरांनी तिला समजावून सांगितले की, हे खरे मूल नसून प्लास्टिकची बाहुली आहे. डॉक्टरांनी गर्भधारणेशी संबंधित इतर कागदपत्रे आणि एक्स-रे देखील तपासले जे बनावट असल्याचे आढळले. (हेही वाचा: Crime: पत्नी आणि सासरच्या मंडळीकडून व्यक्तीची हत्या, गुन्हा दाखल)
वैद्यकीय अधीक्षक, डॉ. हर्षित यांच्या म्हणण्यानुसार, महिलेने दावा केल्याप्रमाणे गर्भधारणेशी संबंधित तपासणीसाठी नव्हे तर पोटाच्या संसर्गाच्या उपचारांसाठी ती नेहमी आरोग्य केंद्राला भेट देत होती. याआधी जूनमध्ये लखनौमध्ये असाच एक प्रकार समोर आला होता. अपत्य नसल्यामुळे महिलेने प्रदीर्घ काळ गर्भवती असल्याचे खोटे नाकात केले व त्यानंतर चोरीचे मूल विकत घेतले.