उत्तर प्रदेशातील संभल (Sambhal) जिल्ह्यातून बालात्क्राची एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथे एका मुलीचे अपहरण करून 20 दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पाच तरुणांनी तिच्यावर तब्बल 20 दिवस अत्याचार केले. स्थानिक पोलिसांनी सोमवारी या घटनेचा खुलासा केला असून प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच जणांनी प्रथम 19 वर्षीय मुलीचे अपहरण केले आणि त्यानंतर तिला 20 दिवस घरात ओलीस ठेवले. यावेळी पाच तरुणांनी तरुणीवर सतत बलात्कार केला. आता हे प्रकरण समोर आल्यानंतर यूपीमध्ये खळबळ उडाली आहे.
महत्वाचे म्हणजे या 19 वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात अनेक महिलांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. संभल कोतवाली येथील काही महिलांसह एकूण 7 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली आहे. (हेही वाचा: Uttar Pradesh Crime: दारूच्या नशेत पत्नीचा गळा दाबून केला खून, उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना)
तपासाचे नेतृत्व करणारे एसएचओ अनूप शर्मा यांनी सांगितले की, सातही आरोपी फरार असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ही बाब तेव्हा उघडकीस आली जेव्हा 12 ऑक्टोबर रोजी मुलगी आरोपींच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि आपल्या कुटुंबाकडे परतली. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, गेल्या महिन्यात 27 सप्टेंबर रोजी ती काही कामानिमित्त घराबाहेर पडली असताना मोहम्मद अर्शद आणि असीमने तिचे अपहरण केले.
अपहरणानंतर अर्शद आणि असीमने तिला अंमली पदार्थ पाजून बेशुद्ध केले आणि नंतर तिला मुरादाबाद जिल्ह्यातील त्यांचा मित्र आशिक खान याच्या घरी नेले. येथे अर्शद, असीम आणि आशिक खान यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर सोनी हुसैन आणि फैज आलम यांनीही मुलीला बलात्काराची शिकार बनवले. आरोपींमध्ये सायरा बेगम आणि जेबा खान या दोन महिलांचाही समावेश असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीवर 20 दिवस रोज अत्याचार केले जात होते. 12 ऑक्टोबर रोजी तिने आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका केली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले.