UP: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह राप्ति नदीत फेकून देत असल्याच्या व्हिडिओ व्हायरल, गुन्हा दाखल
UP Viral Video (Photo Credits-ANI)

उत्तर प्रदेशातील बलरामपुर येथे हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये दोन तरुण एक मृतदेह राप्ति नदीच्या पुलावरुन तो खाली फेकत असल्याचे दिसून येत आहे. मृतदेह फेकणाऱ्या एका तरुणाने पीपीई किट घातली आहे. ही घटना सिसई घाटात असलेल्या पुलावर घडल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे.वैद्यकिय अधिकाऱ्यांनी म्हटले की, व्यक्तीचा मृतदेह कोविड प्रोटोकॉल नुसार नातेवाईकांकडे सोपवला होता. प्रथमदृष्ट्या असे समोर आले आहे की, नातेवाईकांनी शव नदीत फेकले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओ 29 मे रोजीच्या संध्याकाळचा आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पीपीई किट न घातलेल्या तरुणाची ओळख पटली आहे. त्याचे नाव चंद्र प्रकाश असे असून स्मशानात काम करतो. आजतक सोबत बातचीत करताना असे म्हटले की, काही लोकांनी त्याला पुलावर बोलावले होते आणि मृतदेह खाली टाकला.(राजस्थान: आरोग्य विभागाचा मोठा निष्काळजीपणा उघडकीस, महिलेला एकाच वेळी दिले लसीचे दोन्ही डोस)

Tweet:

चंद्र प्रकाश याने पुढे असे म्हटले की, काही लोक आली आणि त्यांनी मला पुलावर नेले. मी पुलाच्या दुसऱ्या बाजूला उभा होतो. तेव्हा एक तरुणाने बॅगेची चैन खोलून दगड टाकला आणि मला बोलावले. त्यानंतर शव नदीत फेकून पुन्हा निघून गेला. मी त्याला सांगितले की, येथे काही मुली सुद्धा आहेत. तर त्याने म्हटले की, मला पोहायचे आहे. त्याच्यासोबत काहीजण होती त्यांनी सुद्धा माझे ऐकले नाही.

दरम्यान, या प्रकरणी सीएमओ डॉ. विजय बहादुर यांनी सांगितले की, कोरोनाची लागण झाल्याने रुग्णाला 25 मे रोजी संयुक्त जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 28 मे रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कोविड प्रोटोकॉल नुसार त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला गेला. परंतु त्यांनी अंतिमसंस्कार करण्याऐवजी तो नदीत फेकून दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पुढील कार्यवाही केली जात आहे.