उत्तर प्रदेश निवडणूक 2022 (Uttar Pradesh Assembly Election) बाबत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (Congress ) महिलांना 40% उमेदवारी देणार आहे. लखनऊ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रियंका गांधी यांनी ही माहिती दिली. प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे की, आम्ही इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. प्रियंका यांनी पुढे म्हटले की, जर माझे आणखी चालले असते तर मी 50% महिलांना उमेदवारी दिली असती. उत्तर प्रदेशमध्ये आरक्षण वाढले तरच देश पुढे जाईल. 'लड़की हूं, लड़ सकती हूं' हा काँग्रेसचा नारा असल्याचे प्रियंका गांधी यांनी या वेळी सांगितले.
प्रियंका गांधी यांनी सांगितले की, 40% उमेदवारी तिकीट देण्याचा निर्णय उन्नावच्या मुलीसाठी आहे. जिला जाळून मारण्यात आले. हा निर्णय हातरसच्या मुलीसाठी आहे जिला न्याय मिळाला नाही. लखमीपूरमध्ये एक मुलगी भेटली तिने म्हटले मी पंतप्रधान बनू इच्छिते. तिच्यासाठी हा निर्णय आहे. हा निर्णय सोनभद्रच्या त्या महिलेसाठी आहे जीने आपल्यासठी आवाज उठवला होता. उत्तर प्रदेशच्या प्रत्येक महिलेसाठी हा निर्यण आहे. जी उत्तर प्रदेशला पुढे घेऊन जाऊ इच्छिते. (हेही वाचा, Lakhimpur Kheri Violence: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह इतर तीन जणांना लखीमपूर खेरीला जाण्याची यूपी सरकारने दिली परवानगी)
ट्विट
The Congress party has decided that it will give 40% of the total election tickets to women in the state: Congress leader Priyanka Gandhi Vadra on 2022 Uttar Pradesh Assembly elections pic.twitter.com/WGPTSLbDcx
— ANI UP (@ANINewsUP) October 19, 2021
प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यासह भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. हे सरकार उघडपणे सर्वसामान्य नागरिकांना उद्ध्वस्त करत आहे. त्यांच्यावर अन्याय करत आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये नकार आणि तिरस्काराचे वातावरण आहे. हे वातावरण केवळ महिलाच बदलू शकतात.