Gujarat Lightning Strikes Killed: अवकाळी पावसात वीज कोसळून 20 जणांचा मृत्यू; गुजरात राज्यातील घटना
Lightning | Representational image (Photo Credits: pixabay)

Unseasonal Rain in Gujarat: अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून (Gujarat Lightning Strikes Killed) गुजरात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडल्या. ज्यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले असून, शक्य त्या सर्व ठिकणी मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील घटनेची नोंद घेतली आहे. शाह यांनी मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांप्रती दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, आवश्यक ठिकाणी मदत पोहोचवण्याच्या सूचनाही प्रशासानाला दिल्या आहेत.

अवकाळी पावसादरम्यान कोसशली वीज

राज्य आपत्ती निवारण विभाग (SEOC) ने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून झाला आहे. हे सर्व मृत्यू राज्याच्या विविध विभागांमध्ये झाले आहेत. महत्त्वाचे असे की, हे सर्व मृत्यू केवळ वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळेच घडले आहेत. रविवारी घडलेल्या या घटनेमध्ये चार जण हे दौहाड जिल्ह्यातील, तीन बहरुच, दोन तापी आणि प्रत्येकी एक जण हा अहमदाबाद, अमरेली, बनासकांटा, बोटाड, खेडा, म्हैसाना, पंचमहल, सबरकंठा, सूरत, सुरेंद्रनगर आणि देवभूमी द्वाराका येथील आहेत, असे एसइओसी अधिकाऱ्याने म्हटले आहे. (हेही वाचा, Marathwada Rain: मराठवाड्यात वीज कोसळून एकूण 6 जणांचा मृत्यू, मृतांत मायलेकीचा समावेश)

अमित शाह यांना दु:ख

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या एक्स हँडलवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, रविवारी झालेल्या अवकाळी पावसात वीज कोसळून घडलेल्या मृत्यूाबाबत मला प्रचंड दु:ख झाले आहे. खराब वातावरण आणि अवकाळी पावसादरम्यान अनेक ठिकाणी वातावरण अतिशय खराब पाहायला मिळाले. ज्यामुळे या घटना घडल्या. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या अपूरणीय नुकसानाबद्दल मी माझ्या मनापासून शोक व्यक्त करतो. स्थानिक प्रशासन मदतकार्यात गुंतले आहे, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे.

234 तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस

दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पावसाचा जोर सोमवारी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. SEOC डेटानुसार, रविवारी गुजरातच्या 252 पैकी 234 तालुक्यांमध्ये पाऊस झाला, सुरत, सुरेंद्रनगर, खेडा, तापी, भरूच आणि अमरेली जिल्ह्यांमध्ये 16 तासांत 50-117 मिमी पावसाची नोंद झाली, त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आणि पिकांचेही नुकसान झाले. राजकोटच्या काही भागांना गारपिटीचा तडाखा बसला.

एक्स पोस्ट

दुसऱ्या बाजूला अचानक झालेल्या पावसामुळे स्थानिक लोक आनंद व्यक्त करताना दिसले. पिकांचे नुकसान होण्यासोबतच पावसाचा परिणाम सौराष्ट्र विभागातील मोरबी जिल्ह्यातील सिरेमिक उद्योगावरही झाला. कारण अचानक आलेल्या पावसामुळे कारखाने बंद ठेवणे भाग पडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आयएमडीच्या अहमदाबाद केंद्राच्या संचालक मनोरमा मोहंती यांनी सांगितले की, सोमवारी पाऊस कमी होईल आणि दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र जिल्ह्यांच्या काही भागात केंद्रित राहील.