Unique Love Story (संग्रहित संपादित प्रतिमा)

गोरखपूरच्या (Gorakhpur) विकासखंड बड़हलगंज येथे एक लग्न सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. येथे 40 वर्षीय अविवाहित बलेंद्र उर्फ ​​बलाई यादवने 10 मुलांची विधवा आई 42 वर्षीय सोनी शर्मासोबत लग्न केले आहे. बालेंद्र हा नकैल (देवरिया) येथील असून सोनी शर्मा दादरी (बरहालगंज) येथील आहे. दोघांमध्ये बरेच दिवस प्रेमप्रकरण सुरू होते व महत्वाचे म्हणजे दोघेही गेल्या वर्षभरापासून फरार होते. काही दिवसांपूर्वी हे दोघे सोनीच्या दादरी गावात आल्यावर गावातील लोकांना या दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली.

त्यानंतर गावातील लोकांनी जयप्रकाश शाही आणि गुरुकुल पीजी कॉलेज दादरीचे प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत बोलावली आणि गावकऱ्यांनी गावातील शिवमंदिरात या दोघांचे लग्न लावून दिले.

बलेंद्र उर्फ ​​बलाई यादव हा अविवाहित होता, तर सोनीदेवीच्या पतीचे 6 वर्षांपूर्वी निधन झाले होते. दोघांमध्ये अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. दोघेही गेल्या वर्षभरापासून फरार होते. दोघांना बोलावून चौकशी केली आणि मग पंचाईत झाली. दोघांनीही आपण एकमेकांवर प्रेम करत असल्याची कबुली दिली. त्यानंतर शुक्रवारी दादरी गावातील शिवमंदिरात बालेंद्र उर्फ ​​बलाई यादव याने सोनीदेवीच्या भांगात कुंकू भरले आणि दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातला. सध्या या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा: Crime: शुल्लक कारणांवरून पत्नीसह दोन मुलांवर कुऱ्हाडीने वार, महिलेचा मृत्यू)

गावातील गुरुकुल पीजी कॉलेजचे व्यवस्थापक जयप्रकाश शाही आणि मुख्य प्रतिनिधी सतीश शाही यांनी सांगितले की, दोघांमध्ये पाच वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि मंदिरात गावकऱ्यांच्या उपस्थितीत लग्न केले. या नात्यामुळे दोघेही खूश आहेत. सोनी शर्माच्या मुलांनाही या नात्याबाबत कोणतीही अडचण नाही. महत्वाचे म्हणजे जयप्रकाश शाही यांनी विवाहित जोडप्यांना कॉलेजमध्ये नोकरीसाठी जागेवरच नियुक्तीपत्रे दिली. तसेच या दोघांनाही गुरुकुल संस्था समूहाच्या निवासी जागेत शिफ्ट होण्याची परवानगीही दिली.