केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल (Union Railway Minister Piyush Goyal) यांच्या आई आणि मुंबई भाजपाच्या (BJP Mumbai) प्रसिद्ध नेत्या चंद्रकांता गोयल (Chandrakanta Goyal) यांचे आज 6 जून रोजी दुःखद निधन झाले आहे. त्या 88 वर्षाच्या होत्या. मुंबईतील माटुंगा (Matunga) विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांता या यापूर्वी आमदार होत्या. पियुष गोयल यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. यांनंतर, नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), आमदार रोहित पवार (Rohit Pawar) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) , केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) , पूनम महाजन (Poonam Mahajan), पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी खास ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच पियुष गोयल व परिवाराचे सांत्वन करत त्यांना आधार दिला आहे.
पियुष गोयल यांनी ही दुःखद बातमी देताना एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. “आपल्या आपुलकीने प्रेमाने मला मार्ग दाखवणारी माझी आई चंद्रकांता गोयल यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांनी संपूर्ण जीवनभर लोकांची सेवा केली. तसेच त्यांनी मलाही लोकांची सेवा करावी अशी प्रेरणा दिली. देव त्यांना त्यांच्या चरणाशी जागा देवो, ॐ शांती,” असे ट्विट पियुष गोयल यांनी केले आहे.
पियुष गोयल ट्विट
अपने स्नेह, और प्रेम से मुझे हमेशा राह दिखाने वाली मेरी पूज्य माता जी का आज सुबह स्वर्गवास हो गया।
उन्होंने अपना पूरा जीवन सेवा करते हुए बिताया, और हमें भी सेवाभाव से जीवन बिताने को प्रेरित किया। ईश्वर उन्हें अपने श्री चरणों मे स्थान दें। ॐ शांतिः pic.twitter.com/mwlIks6TBJ
— Piyush Goyal (@PiyushGoyal) June 6, 2020
नितिन गडकरी ट्विट
भाजपा की वरिष्ठ नेत्री एवं केंद्रीय मंत्री श्री @PiyushGoyal जी की माता चन्द्रकांता गोयल जी के निधन का दुखद समाचार प्राप्त हुआ। जनसंघ के समय से चंद्रकांता जी ने वेदप्रकाश गोयल जी के साथ कंधे से कंधा मिलाकर पार्टी को बढ़ाने में बड़ा योगदान दिया है।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 6, 2020
देवेंद्र फडणवीस ट्विट
केंद्रीय मंत्री पियुष गोयल जी इनकी माताश्री श्रीमती चन्द्रकांताजी गोयल इनका आज देहान्त हुआ.
उन्होंने स्वयं भाजपा में सक्रिय ज़िम्मेदारी से काम किया. सेवा यह उनका स्थायिभाव था और अन्त तक रहा.
हम सब गोयल परिवार के दुःख में शामिल है.
उन्हें मेरी भावपूर्ण श्रद्धांजलि !
ॐ शांतिः
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 6, 2020
सुप्रिया सुळे ट्विट
केंद्रीय रेल्वेमंत्री @PiyushGoyal जी यांना मातृशोक झाला.गोयल कुटुंबियांवर कोसळलेल्या या दु:खद प्रसंगात आम्ही त्यांच्या सोबत आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/qKfjy0agU7
— Supriya Sule (@supriya_sule) June 6, 2020
स्मृती इराणी ट्विट
Condolences @PiyushGoyal bhai .. had the good fortune of working with her in Mumbai. Forever at the forefront of helping the destitute. May her soul rest in peace 🙏 https://t.co/OfZS6nN0d2
— Smriti Z Irani (@smritiirani) June 6, 2020
पूनम महाजन ट्विट
Pained to hear of the sad demise of Smt. Chandrakanta Goyal ji. In Mummy, BJP had strong voice in the assembly and a loving leader. The entire Goyal family has been a pillar of strength for us in Maharashtra.
My condolances to @PiyushGoyal ji & the entire family.
Om Shanti !
— Poonam Mahajan (@poonam_mahajan) June 6, 2020
रोहित पवार ट्विट
रेल्वेमंत्री @PiyushGoyal जी यांच्या मातोश्री चंद्रकांता गोयल (८८) यांचं निधन झाल्याची दुःखद वार्ता समजली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. या दुःखातून सावरण्याची ताकद गोयल कुटुंबाला मिळो ही प्रार्थना.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 6, 2020
पंकजा मुंडे ट्विट
त्या @PiyushGoyal जी यांच्या मातोश्री आहेत, त्यांच्या परिवाराच्या प्रती मी सद्भावना व्यक्त करते. #Covid19 ची परिस्थिती व्यवस्थित झाल्यावर घरी जाऊन भेट घेईल.
ॐ शांतिः
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 6, 2020
दरम्यान, गोयल कुटुंब हे पूर्णतः जनसंघ आणि भाजपाशी संबंधित आहे. चंद्रकांता गोयल यांचे पती वेद प्रकाश गोयल हे अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये भाजप नेते आणि जहाज वाहतूक मंत्री देखील होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी गोयल कुटुंबाचे खास नाते होते.