काँग्रेस हा लवकरच केवळ ट्विट करणारा पक्ष उरेल; प्रकाश जावडेकर यांची राहुल गांधी ना टार्गेट करत जोरदार टीका
Prakash Javdekar Slams Rahul Gandhi (Photo Credits: ANI)

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी आज काँग्रेस (Congress)  पक्ष आणि त्याचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर अनेक टीका केल्या आहेत. यापूर्वी काही दिवसांपासून खासदार राहुल गांधी हे वारंवार केंद्र सरकारला टार्गेट करत ट्विट करत होते या सर्व ट्विट्सचा समाचार घेत जावडेकर यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस हा लवकरच केवळ ट्विटर वर ऍक्टिव्ह पक्ष उरेल कारण ज्या राज्यात सत्ता आहे तिथे काँग्रेसचं सरकार डगमगत असल्याचंच दिसतंय. एकामागोमाग एक राज्यात काँग्रेसच्या हातातून परिस्थिती निसटताना दिसत आहे अशावेळी त्यांना केंद्रावर कितीही आरोप लावायचे असतील तर लावूदे पण त्यात यश कधीच मिळणार नाही असेही जावडेकर यांनी ANI शी बोलताना म्हंटले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने सन्मान गमावला- राहुल गांधी

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने कोरोना संकटकाळात काय केलं यावर उपरोधिक भाष्य करणारं एक ट्विट केलं होतं. यात फेब्रुवारी मध्ये नमस्ते ट्रम्प, मार्च मध्ये मध्य प्रदेश सरकार पाडणं, एप्रिल मध्ये दिवे लावणं, मे मध्ये लोकसभा विजयाचं सेलिब्रेशन, जून मध्ये बिहारची व्हर्च्युअल रॅली आणि आता जुलै मध्ये राजस्थान सरकार पडण्याचा प्रयत्न हे केंद्र सरकारचं काम आहे असं राहुल यांनी म्हंटलं होतं.  अर्थव्यवस्थेवरील संकटाबाबत बोललो तेव्हा भाजप आणि प्रसारमाध्यमांनी माझी खिल्ली उडवली; राहुल गांधी यांचे ट्विट

या ट्विट ला उत्तर देत जावडेकर यांनी राहुल गांधी यांनी मागील 6 महिन्यात काय केलं हे सुद्धा आपण पाहुयात असे म्हणत पुढे सगळा टीकांचा पाढा वाचून दाखवला. राहूल गांधी यांनी फेब्रुवारीत शाहीन बाग आणि दंगलीला प्रोत्साहन दिलं, मार्च मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया व खासदार गमावले, एप्रिलमध्ये मजुरांना भडकवण्याचा प्रयत्न केला, मे महिन्यात लोकसभेतील ऐतिहासिक पराभवाचा 6 वा वर्धापन दिन साजरा केला, जूनमध्ये चीनची वकिली व जुलैमध्ये राजस्थानात सत्तासंघर्ष हे काम केलं असल्याचं जावडेकर यांनी म्हंटल आहे.

ANI ट्विट

राहुल गांधी यांनी मागील काही दिवसांपासुन ट्विटर वर टीकांची मालिका सुरु केली आहे. काल सुद्धा नरेंद्र मोदी यांनी आपली खोटी बलवान प्रतिमा तयार केली पण त्यांच्यात आता लढण्याची क्षमता नाही अशा आशयाचं ट्विट राहुल यांनी केलं होतं