EBloodServices (Photo Credits: Twitter/@drharshvardhan)

रक्तदानासाठी आवश्यक असलेल्या रक्ताचा पुरवठा त्वरीत व्हावा यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr. Harsh Vardhan) यांनी नवा मोबाईल अॅप लॉन्च केला आहे. हे मोबाईल अॅप C-DAC India च्या टीमने डेव्हलअप केले असून यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटीने (Indian Red Cross Society) यासाठी पुढाकार घेतला आहे. 'eBloodServices'  असे या अॅपचे नाव आहे.

"आज मी eBloodServices लॉन्च करत आहे. त्यामुळे रक्ताचा पुरवठा सुलभ होईल. जर कोणी या अॅपमध्ये रक्ताची गरज असल्याची मागणी केली तर त्या व्यक्तीला कोणत्या ब्लड बँकेत रक्त उपलब्ध आहे, हे अॅपमधील ‘ERatkosh' डॅशबोर्डमध्ये दिसेल. त्यामुळे रक्ताचा पुरवठा लवकरात लवकर करण्यास मदत होईल, असे हर्षवर्धन यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

Health Minister Harsh Vardhan Tweet: 

तसंच हे अॅप गरजूंसाठी वरदान ठरेल. इंडियन रेड क्रॉस यांनी विविध आरोग्य कार्यक्रमाद्वारे सरकारला नेहमीच मदत केली आहे. कोविड-19 च्या काळात त्यांनी केलेली ही मदत खूपच फायदेशीर ठरणार आहे. या अॅपद्वारे गरजूंना लवकरात लवकर रक्त मिळण्यास नक्कीच मदत होईल. तसंच हे अॅप दिल्ली-एनसीआर या भागात कार्यरक असेल. युजर एका  वेळेला 4 युनिट्सपर्यंत ऑर्डर करु शकतात. हा एक उयुपक्त अॅप असून लवकरच देशाच्या इतर राज्यातही हे अॅप सुरु केले जाईल, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.