केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज सलग सातव्यांदा अर्थसंकल्प मांडला आहे. मोदी सरकार 3.0 चा हा पहिला अर्थसंकल्प आहे. यामध्ये मोदी सरकारकडून युवकांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता नव्या करप्रणाली मध्ये टॅक्स स्लॅब बदलण्यात आले आहेत. पर्सनल टॅक्स प्रमाणेच अन्य वस्तू आणि सेवांवरही करात बदल करण्यात आले आहेत त्यामुळे आता काही वस्तूंच्या किंमतीमध्ये बदल झाले आहेत. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. त्यामुळे जाणून घ्या नेमकं काय काय स्वस्त होणार आहे आणि कशामुळे आर्थिक फटका बसू शकतो. Union Budget 2024: पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना 15 हजारांचा प्रोत्साहनपर भत्ता; नोकऱ्यांसदर्भात सरकारची तीन गेमचेंजर योजना .
बजेट नंतर आता काय स्वत होणार?
सोनं, चांदी
मोबाईल हँडसेट
मोबाईलचे सुटे भाग
कॅन्सरवरची औषधे
पोलाद, तांबे उत्पादनावरील प्रक्रियेवर करसवलत
लिथियम बॅटरी
इलेक्ट्रीक वाहने
सोलार सेट
चामड्यांपासून बनणाऱ्या वस्तू
पीवीसी फ्लेक्स बॅनर
विजेची तार
बजेट नंतर काय महागणार?
प्लास्टिक उद्योगांवर कर वाढवले जाणार असल्याने आता प्लास्टिक उत्पादने महाग होणार आहे. सोलर सेल किंवा सोलर मोड्युल बनवण्यासाठी वापरली जाणारी सोलर ग्लास देखील महागणार आहे.
यासोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्टॅडर्ड डिडक्शन मध्ये बदल करण्यात आले आहेत तर टॅक्स स्लॅब मध्येही बदल करण्यात आले आहेत. अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टॅक्स स्लॅब मध्ये झालेल्या बदलामुळे सामान्य नोकरदाराचे 17,500 रूपये वाचणार आहे. हा टॅक्स स्लॅब मधील बदल केवळ नव्या टॅक्स रेजिम मध्ये आहे. जुन्या करप्रणालीनुसार टॅक्स भरणार्यांना तसेच टॅक्स भरावे लागणार आहेत.