केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात विविध घोषणा केल्या. प्रामुक्याने देशभरात आगामी काळात विधानसभा निवडणूक Assembly Elections 2021) पार पडणाऱ्या राज्यांवर अर्थमंत्र्यांची विशेष मर्जी दिसून आली. खास करुन अमस, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्यांमध्ये रस्तेनिर्माण करण्याची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी पश्चिम बंगाल राज्यांमध्ये 95,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 675 किलोमीट लांबीचा हायवे बनविण्यात येईल. हा महामार्ग कोलकाता ते सिलीगुडी या दोन शहरांना जोडणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात नागपूर आणि नाशिक मेट्रोसाठीही भरीव तरदूद करण्यात आली आहे.
अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सडक, परिवहण आणि राज्यमार्ग आदींसाठी 1.18 लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. याअंतर्गत केरळ मध्ये 65000 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन 1100 किलोमीटर लांबीचा राज्य मार्ग बनविण्यात येईल. असममध्ये 19 हजार कोटी रुपयांच्या सडक योजनेचा विस्तार केला जता आङे. पुढच्या तीन वर्षांमध्ये 1300 किलोमीटर लांबीचे रस्ते बनविण्यात येतील. अर्थमंत्र्यांनी पुढच्या तीन महिन्यांमध्ये हायवे आणि इकॉनॉमिक कॉरिडोअर बनविण्याचीही घोषणा केली आहे. (हेही वाचा, Union Budget 2021: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला सर्वसाधारण अर्थसंकल्प; कोणत्या क्षेत्राला किती कोटी रुपये मिळाले जाणून घ्या)
अर्थमंत्र्यांनी पुढे म्हटले की, दक्षिणेकडील राज्य तामिळनाडूमध्ये 3500 किलोमीटर लांबीच्या हायवेची निर्मिती केली जाईल. तामिळनाडूत नॅशनल हायवे प्रोजेक्ट आणि इकॉनॉमिक कॉरिडोर 1.03 लाख कोटी रुपयांचा असेल. याशिवाय मुंबई कन्याकुमारी इकॉनॉमिक कॉरिडोरचीही घोषणा करण्यात आली आहे.
आपल्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी दोन शहरांमध्ये मेट्रो लाईट आणि मेट्रोनियो सेवा सुरु करण्याचीही घोषणा केली. त्यांनी म्हटले की, नवा प्रकल्पांमध्ये मेट्रो ट्रेनच्या तुलनेत कमी गुंतवणूकअसेल. अर्थमंत्र्यांनी चेन्नई, नागपूर यांसह अनेक शहरांमध्ये मेट्रो नेटवर्क विस्तार करण्याचीही घोषणा केली. यात आगामी काळात रेल्वेसाठी 1.1 लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे.