समान नागरी कायदा, आरक्षण किंवा जनसंख्या नियंत्रण? राज्यसभा, लोकसभा खासदारांना भाजपने बजावलेल्या 'या' व्हीपवरून सोशल मीडियावर बांधले जातायत अंदाज
Image For Representation (Photo Credits: ANI)

दिल्ली विधानसभेच्या निवडणूक (Delhi Vidhansabha Elections Results)  निकालावर सर्व देशाचे लक्ष केंद्रित असताना आज राज्यसभेत (Rajyasabha) मोदी (Narendra Modi) सरकार कडून महत्वाचे विधयेक मांडले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये नेमका कोणता नवा मुद्दा चर्चेसाठी आणला जाईल याची अधिकृत माहिती नसली तरी सोशल मीडियावर काही मुद्दे मांडले जात आहेत. नेटकऱ्यांच्या मते समान नागरी कायदा (Uniform Civil Code) , आरक्षण बिल, जनसंख्या नियंत्रण हे मुद्दे मांडले जाण्याची अधिक शक्यता आहे. मात्र अशा चर्चा रंगण्याचे कारण म्हणजे काल, सोमवारी संध्याकाळी भाजपकडून सर्व राज्यसभा खासदारांना एक व्हिप जाहीर करण्यात आली होती. या व्हीप मध्ये आजच्या सत्रात महत्वाचे विधेयक मांडून ते मंजूर करायचे आहे त्यासाठी सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे आणि सरकारचे समर्थन करावे असे बजावण्यात आले आहे.

दुसरीकडे, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन दोन्ही सभागृहात बजेटवर झालेल्या चर्चेला उत्तर देतील. याच दिवशी भाजपकडून दोन्ही सभागृहातील खासदारांना व्हिप बजावण्यात आला आहे.

काय म्हणतायत नेटकरी?

ANI ट्विट

दरम्यान, भाजपचा व्हिप जाहीर होताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आला आहे. जम्मू काश्मीरमधील कलम 370 काढणे, राम मंदिर ट्रस्टची घोषणा आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा ही विधेयक मांडतेवेळी सुद्धा अशा प्रकारे व्हीप जाहीर करण्यात आला होता, आता त्याच पाठोपाठ लोकसभेच्या जाहीरनाम्यातील भाजपचे पुढील आश्वासन म्हणजेच समान नागरी कायदा विधयेक देखील पूर्ण करण्याची तयारी सुरु असल्याची दाट शक्यता आहे.