केंद्र सरकार देशात वाढणारी महागाई (inflation) कमी करण्यासाठी सातत्याने उपाययोजना करत आहे मात्र त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळताना दिसत नाही आहे. अशातच देशात बेरोजगारीचा (unemployment) दर देखील कमी झाल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी दिली. नव्या आकडेवारीनुसार, 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर 6 टक्के होता, जो 2022-23 मध्ये 3.2 टक्क्यांवर आला आहे. सीतारामन यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बेरोजगारीवरुन विरोधक मोदी सरकारवर जोरदार टिका करत आहे. (हेही वाचा - 12 Lakh Jobs in India: भारतामध्ये 1.14 लाख स्टार्टअप्स मधून 12 लाख नोकर्यांची निर्माण झाली संधी - केंद्रीय अर्थमंत्रालयाची माहिती)
लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्पावरील चर्चेनंतर त्यांच्या उत्तरात अर्थमंत्री सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले की, 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर 6 टक्के होता, जो 2022-23 मध्ये 3.2 टक्क्यांवर आला आहे. देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी झाल्याने कामगार संख्याही वाढली आहे. 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर 6.1 टक्के होता, जो 45 वर्षांतील सर्वाधिक आहे.
दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली, राज्यातील खासदारांनी बुधवारी 7 फेब्रुवारी 2024 रोजी जंतरमंतरवर आंदोलन केले. देशाला सर्वाधिक महसूल देणारे कर्नाटक हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असूनही सरकार राज्याला आपला वाटा देत नसल्याचा आरोप त्यांनी केली होता. त्यांच्या या आरोपाला अर्थमंत्री सीतारामन यांनी उत्तर दिले. 15 व्या वित्त आयोगानुसार आम्ही कर्नाटकसह सर्व राज्यांसाठी निधी देत आहोत. त्यामुळे कर्नाटकला निधी न देण्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले.