उल्हासनगरमध्ये एका राजकिय व्यक्तीच्या हत्येने परिसरात दहशतीचे वातावरण पहायला मिळत आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच या भागात मध्यरात्री शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शाखाप्रमुख शब्बीर शेख यांची हत्या करण्यात आली आहे. जय जनता कॉलनी येथे एका जुगाराच्या क्लब बाहेर ही हत्या झाली. नुकतेच शिंदे गटाचे शाखाप्रमुख पद देण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल झाला असून या व्हिडिओत 4-5 जण हे चॉपर आणि तलवारीने शब्बीर शेख यांच्यावर हल्ला करताना दिसून येत आहे.
दरम्यान या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पहायला मिळत आहे. या हल्लेखोरांनी शब्बीर शेख यांच्यावर दहा ते बारा वार केले. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. शेख यांची परिस्थिती गंभीर बनल्याने त्यांना कल्याण येथील एका रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी संशयित आरोपींचा तपास करत आहे.
या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत असून सीसीटीव्हीमध्ये असेलेल्या आरोपीने हल्ला करताना चेहऱ्यावर रुमाल बांधल्यामुळे त्यांची ओळख पटवणे हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.