Aadhar Card (Photo Credits: PTI)

आधार कार्ड (Aadhar Card) भारतात एक महत्वपूर्ण कागदपत्रांपैकी एक आहे. त्यासंदर्भातील सर्व माहिती आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून मिळते. परंतु देशातील एक असा बहुसंख्य वर्ग आहे तेथे इंटरनेटचा वापर केला जात नाही. अशा लोकांसाठी आता UIDAI ने काही सुविधा सुरु केल्या आहेत. त्याच्या माध्यमातून इंटरनेट शिवाय फक्त एका एसएमएसच्या आधारे त्या संबंधित सर्व माहिती मिळणार आहे. तर जाणून घ्या याबद्दल अधिक.

या सेवेच्या माध्यमातून युजर्सला काही अन्य सुविधा जसे वर्च्युअल आयडी (VID) चे जनरेशन किंवा रिट्रिवल, आपले आधार लॉक-अनलॉक करणे, बायोमेट्रिक लॉकिंग आणि अनलॉकिंग सारख्या काही सुविधा सुद्धा मिळणार आहेत. ऐवढेच नव्हे तर जी सुविधा तुम्हाला हवी आहे त्यासाठी रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून हेल्पलाइन क्रमांक 1947 वर एक SMS पाठवावा लागणार आहे. तर जाणून घ्या या सुविधेचा लाभ कसा घ्याल. (Whatsapp Testing New Crypto Feature: व्हॉट्सअॅपवर लवकरच क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होणार सुरू)

Virtual ID अशा पद्धतीने जनरेट करा-

>वर्च्युअल आयडी तयार करण्यासाठी तुम्ही मोबाइलच्या SMS मध्ये जाऊन GVID (SPACE) आणि तुमच्या आधारचे अखेरचे 4 क्रमांक द्या, त्यानंतर हा मेसेज 1947 क्रमांकावर पाठवा.

-आपला VID मिळवण्यासाठी RVID (SPACE) आणि आपला आधार क्रमांकाचे अंतिम चार क्रमांक द्या.

-तुम्ही दोन पद्धतीनो ओटीपी मिळवू शकता. प्रथम म्हणजे आधार क्रमांकाच्या माध्यमातून आणि अन्य म्हणजे VID च्या माध्यमातून.

अशा प्रकारे तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. या व्यतिरिक्त एसएमएसच्या माध्यमातून आधार कार्ड लॉक-अनलॉक करता येईल. जेणेकरुन तुमच्या आधारकार्डचा गैरफायदा कोणीही घेणार नाही. परंतु त्यासाठी सुद्धा तुमचा VID असे जरुरी आहे.