कोची: हेलिकॉप्टरचा दरवाजा कोसळल्याने 2 नौसैनिकांचा मृत्यू
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा तुटल्याने दोन नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर तीनजण जखमी झाले आहेत. कोची (Kochi) नेव्हल बेसमध्ये हा अपघात घडला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या सैनिकांची ओळख अद्याप पटलेली नाही. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा या दोन्ही नौसैनिकांच्या अंगावर कोसळल्याने या नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे.

या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.