Cardiac Arrest: लग्नाच्या एक महिना आगोदर नवरदेवाचे निधन, लग्नपत्रिका वाटताना हृदयविकाराचा झटका
Heart Attack | (Photo credits: Pixabay)

Chandramouli Reddy Pass Away: तिरुमला तिरुपती देवस्थानम (Tirumala Tirupati Devasthanam) चे कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी (Dharma Reddy) यांचा 28 वर्षीय मुलगा चंद्रमौली रेड्डी (Chandramouli Reddy) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चंद्रमौली रेड्डी, ज्यांचे पुढील महिन्यात लग्न होणार होते.  त्यांनी चेन्नईतील कावेरी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. जिथे त्यांना 18 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर लगेचच डॉक्टरांनी ECMO केले आणि पूर्णपणे बंद झालेल्या कोरोनरी आर्टरीमध्ये स्टेंट टाकला होता. परंतू, वैद्यकीय उपचारांचा फारसा परिणाम झाला नाही. तीन दिवस आयुष्याशी झुंज दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

धक्कादयक म्हणजे चंद्रमौली रेड्डी लग्नपत्रिका (Wedding Invitation Cards) वाटत होते. आप्तेष्टांना विवाहाचे आग्रहाचे निमंत्रण देतानाच त्यांना चेन्नई येथे हृदयविकाराच झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचार करताना प्रयत्नांची शिकस्त केली. परंतू, त्याला यश आले नाही. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. (हेही वाचा, Heart Attack Death: ह्रदयविकारमुळे होणाऱ्या मृत्यूचं कारण कोरोना? महत्वपूर्ण संशोधनातून धक्कादायक माहिती पुढे)

ट्विट

प्राप्त माहितीनुसार, उद्योगपती ए.जे. यांच्या मुलीशी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यांचे लग्न होणार होते. दोघांची नुकतीच एंगेजमेंट झाली होती. दोन्ही कुटुंब आनंद आणि उत्साहाने लग्नाच्या तयारीत व्यग्र होते. दरम्यान, उभयतांच्यु कुटुंबावर काळाने घाला घातला.