भारत-चीन बॉर्डर (Photo Credits: PTI/File)

भारत-चीन सैन्यांमध्ये LAC वर पुन्हा झटापट झाल्याचं वृत्त समोर आले आहे. दरम्यान ANI ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार सिक्किम मध्ये Naku La भागात LAC वर भारत-चीन सैन्यामध्ये मागील आठवड्यात झटापट झाली आहे. या घटनेमध्ये दोन्ही बाजूचे काही सैन्य जखमी झाले आहेत. दरम्यान काही रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, चीनी सैन्य भारताच्या काही प्रदेशामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना भारतीय लष्कराच्या सैन्याकडून रेटण्यात आले. यावेळीच दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये झटापट झाली आहे.

दरम्यान अशाच प्रकारे गंभीर स्वरूपाची हिंसक झडप मागील वर्षी मे महिन्यात झाली होती. त्यावेळेस काही अधिकारी शहीद झाले होते तर सैन्य जखमी झाले होते. दरम्यान या घटनेनंतर दोन्ही सैन्याच्या टॉप कमांडर्समध्ये उच्च स्तरीय बैठका झाल्या होत्या. हिंसाचार टाळण्यासाठी यामध्ये बोलणी झाली होती. India-China Tensions in Ladakh: भारतीय लष्कराचा अधिकारी, 2 जवान शहीद; गलवान व्हॅलीमध्ये भारत-चीन सैन्यांत तणाव.

ANI Tweet

दरम्यान इंडियन आर्मीने या वृत्ताला दुजोरा देत हा minor face-off असल्याचं म्हटलं आहे. 20 जानेवारीला झालेल्या या घटनेनंतर प्रोटोकॉलनुसार, लोकल कमांडर्सने तो विषय सोडवला असल्याचंही सांगण्यात आले आहे.

पूर्व लद्दाखचा सीमावाद सोडवण्यासाठी काल भारत-चीन मध्ये नवव्या फेरीची चर्चा झाली. या भागात नोव्हेंबर 2020 पूर्वी झालेल्या बातचीत यावर चर्चा तब्बल 15 तास सुरू होती. दरम्यान भारत -चीन सीमावाद 3488 किमी लांब एलएसी बाबत आहे. चीनचा दावा आहे की अरूणाचल प्रदेशच्या दक्षिणी तिब्बत चा हिस्सा आहे. मात्र भारताने ही गोष्ट अमान्य केली आहे.