Indian & Chinese Troops | Representational Image | (Photo Credits: IANS)

भारत- चीन संबंध तणावपूर्ण असताना आता लद्दाख प्रांतातील गलवान व्हॅली (Galwan Valley) भागात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली आहे. दरम्यान काल (15 जून) रात्री झालेल्या de-escalation मध्ये भारतीय सैन्याचं नुकसान झालं आहे. यामध्ये भारताकडून 1 लष्करी अधिकारी आणि 2 जवान शहीद झाली असल्याची माहिती आर्मीच्या हवाल्याने ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे. दरम्यान सध्या भारत-चीन या दोन्ही देशाचे मिलिटरी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असल्याची महिती देण्यात आली आहे. भारताप्रमाणेच चीन सैनिकांचेही नुकसान झाल्याची माहिती आर्मीकडून देण्यात आली आहे. सध्या परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, केंद्रीय मंंत्री राजनाथ सिंग, तिन्ही लष्कर प्रमुख यांच्यामध्ये बैठक झाली आहे.

ANI Tweet

6 जून दिवशी भारत- चीन सैन्यामध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर सैन्य मागे घेण्यास सुरूवात झाली. भारतीय सैन्य दलाचं नेतृत्त्व लेह मध्ये 14 कॉर्प चे कमांडर लेफ्टिनेंट जनरल हरिंदर सिंह करत होते तर चीकडून कमांडर मेजर जनरल लियू लिन सहभागी होते. पैंगोंग झील च्या उत्तर तटवर फिंगर फोर, गालवान घाटी भागात सैन्य पुढे आले होते. यामध्ये  गश्त बिंदु 14, गश्त बिंदु 15 आणि  गश्त बिंदु 17-ए सहभागी होते.

दरम्यान सुत्रांच्या माहितीनुसार, गलवान घाटीमध्ये मोठ्या संख्येमध्ये टेंट लावण्यात आले होते. भारतानेही दक्षता बाळगत अतिरिक्त सैन्य दल पाठवले होते. दरम्यान मागील सहा दशकांपासून हे विवादाचं केंद्र बनलं आहे.