राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रा' नंतर देशात पहिल्यांदाच पार पडत असलेल्या त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील विधानसभा निवडणुकांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (2 मार्च 2023) पार पडत आहे. आज सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. तिन्ही राज्यांमध्ये मिळून एकूण 178 जागांसांठी निवडणूक पार पडली आहे. या जागांसाठी 16 आणि 27 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले आहे. उल्लेखनिय असे की, सन 2023 या नव्या वर्षातील मोठ्या निवडणुकींसाठी झालेले हे पहिलेच मतदान आहे. त्यामुळे या तिन्ही राज्यांच्या जनतेचा कौल काय येतो याबाबत देशभरतून प्रचंड उत्सुकता आहे.
नागालॅंड विधानसभा निवडणूक
नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 60 जागांपैकी 59 जागांसाठी निवडणूक झाली. उर्वरीत एक मतदार संघ. जो की अकुलुतो आहे. अकुलुतो मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने (भाजप) बिनविरोध जिंकला आहे.
मेघालय विधानसभा निवडणूक
मेघालय विधानसभेसाठीही एकूण 60 जागांपैकी एकूण 59 जागांवर निवडणूक पार पडली. कारण उर्वरीत एका जागेवर निवडणूकच रद्द झाली. परिणामी संख्या 60 वरून 59 वर आली आहे.
त्रिपूरा विधानसभा निवडणूक
त्रिपूरा विधानसभेसाठी एकूण 58 जागांसाठी निवडणूक पार पडली. या राज्याकडे सर्वांचे विशेष लक्ष्य आहे. कारण, या ठिकाणी डाव्यांची सत्ता आहे. डाव्यांच्या सत्तेला सुरुंग लावून सत्ता आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप उत्सुक आहे. इतर ठिकाणीही भाजप आणि काँग्रेसने जोर लावला आहे. पत्यक्षात जनतेच्या मनात काय हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्देशानुसार, सकाळी 8:00 वाजता मतमोजणी सुरू होईल. Zee News-Matrize च्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, NPP मेघालयात 21-26 जागांसह आघाडीवर आहे, तर TMC 8-13 जागांसह पिछाडीवर आहे. दुसरीकडे, भाजप केवळ 6-11 जागांवर आहे, तर काँग्रेस 3-6 जागांवर आहे.