Mangaluru Car Accident Video: एका हृदयद्रावक घटनेने मंगळुरु (Mangaluru) शहर हादरुन गेले आहे. ही घटना बुधवारी (18 ऑक्टोबर) दुपारी चारच्या सुमारास लेडीहिल (Ladyhill) परिसरातील फूटपाथवर घडली. फुटपाथवरुन निघालेल्या नागरिकांना पाठिमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक दिली. ज्यात एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले. तर, इतर चार जण गंभीर जखमी झाले. फुटपाथवरील नागरिकांना धडक देऊन चिरडल्यानंतर चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र, काही वेळाने तो पोलिसांना शरण आला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लेटेस्टलीकडून वाचकांना सावध करण्यात येते की, व्हिडिओतील दृश्ये आपल्याला विचलीत करु शकतात. त्यामुळे भावनाप्रधान वाचकांनी हा व्हिडिओ पाहणे शक्यतो टाळावो किंवा स्वत:च्या जबाबदारीवर पाहावा.
घटनेबद्दल अधिक माहिती अशी की, काना, सुरथकल येथील रूपश्री असे पीडितेचे नाव असून, तिला या घटनेत आपला जीव गमवावा लागला. स्वाती (26), हिथनवी (16), कृतिका (16) आणि यथिका (12) अशी जखमींची नावे आहेत. धक्कादायक म्हणजे जखमींमध्ये स्वाती नावाच्या एका महिलेचा अपवाद वगळता बाकी सर्वजण अल्पवयीन आहेत. शहराचे पोलिस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्नागुड्डा येथून लेडीहिलच्या दिशेने पाच मुली मंगला जलतरण तलावाजवळील फूटपाथवरून चालत असताना ही भयानक घटना घडली. कमलेश बलदेव असे कारचालकाचे नाव आहे. भरधाव वेगात वाहन हाकत असलेल्या कमलेशला त्याच्या वाहनावर (कार) नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे त्याची कार फुटपाथवर चढली आणि पुढे चालणाऱ्या नागरिकांना पाठिमागून धडक दिली. (हेही वाचा, Viral Video: भररस्त्यात संपली Nexon EV ची बॅटरी, Ather Electric Scooter वरील चालकाने दिला धक्का, पहा व्हिडिओ)
दरम्यान, अत्यंत क्रूर अशी ही घटना घडल्यानंतर कारचालक कमलेश बलदेव याने जखमींना कोणतीही मदत न करता, त्यांना गंभीर अवस्थेत तेथेच सोडून घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र, पुणे त्याने मंगळुरु पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तो वडील एच एम बलदेव यांच्यासह स्वत:हून हजर झाला. पोलिसांनी आरोपी कमलेश याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम 279 (धोकादायक पद्धतीने आणि आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे), 337 (हानी पोहोचवणे आणि निष्काळजीपणामुळे इतरांच्या मृत्यूस कारण ठरणे) 338 (जीवन किंवा इतरांची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या कृतीमुळे गंभीर दुखापत करणे), 304(A) (निष्काळजीपणामुळे इतरांचा मृत्यू), अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
व्हिडिओ
VIDEO | A woman died and four others were left injured after a speeding car drove onto the footpath and hit pedestrians near Mannagudda junction in Karnataka's Mangaluru earlier today.
(Disclaimer: Disturbing visuals, viewer discretion is advised.)
(Source: Third Party) pic.twitter.com/DegX9AudNE
— Press Trust of India (@PTI_News) October 18, 2023
दरम्यान, व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, नागरिक फूटपाथवरुन नेहमीप्रमाने सुरक्षीत निघाले आहेत. दरम्यान, एक भरधाव कार पाठिमागून येते आणि त्यांना धडक देते. धडक इतकी भयावह आहे की, रस्त्यावरुन चालणारे लोक कारच्या बोनेटमुळे उडतात आणि पुढचे काही फूट अंतरावर जाऊन पडतात. त्यात कार इतकी भरधाव असते की, कारने रस्त्यावरील दोन खांबही तोडल्याचे पाहायला मिळते.