Toolkit Case: छत्तीसगढ पोलिसांकडून भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना धाडली नोटीस
संबित पात्रा (Photo Credit-ANI)

Toolkit Case: छत्तीसगढ पोलिसांकडून भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संबित पात्रा (Sambit Patra) यांना कथित रुपात 'टूलकिट'च्या मुद्द्यावरुन खोट्या बातम्या पसरवल्याने नोटीस धाडण्यात आली आहे. छत्तीगढ पोलिसांनी पात्रा यांना 23 मे रोजी संध्याकाळी 4 वाजता रायपुर मधील सिविल लाइंस ठाण्यात रिपोर्ट करण्यास बोलावले आहे. टूलकिट प्रकरणी कथित रुपात खोट्या बातम्या पसरवल्याच्या आरोपात रायपुर मध्ये दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीनुसार माजी मुख्यमंत्री रमन सिंह आणि पात्रा यांना नोटीस पाठवली आहे.

छत्तीसगढचे एनएसयुआ प्रमुख आकाश शर्मा यांनी आयपीसी अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलिसांना संपर्क केल्यानंतर काँग्रेस रिसर्च विंगचे प्रमुख राजीव गौडा आणि रोहन गुप्ता यांना सहतक्रारकर्ते बनवले आहे. पात्रा यांना धाडण्यात आलेल्या नोटीसमध्ये पोलिसांनी असे म्हटले आहे की, त्यांनी स्वत:हून किंवा व्हिडिओ कॉन्फ्रेंन्सिंगच्या माध्यमातून पोलीस स्थानकात उपस्थितीती लावावी. पोलिसांच्या समन्सला उत्तर न दिल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यापूर्वी, छत्तीसगढ पोलिसांनी टूलकिट संबंधित खोट्या बातम्या पसरवणाऱ्याच्या आरोपाखाली रमन सिंह यांना त्यांनी घरीच थांबण्यासाठी एक नोटीस पाठवील आहे.(Alleged Congress' COVID-19 Toolkit: सरकारचा ट्विटरवरील 'Manipulated Media' टॅग बद्दल आक्षेप)

18 मे रोजी भाजपने आरोप लावला होता की, कोविड महारोगाच्या दरम्यान, पंतप्रधान नरेंदिर मोदी यांची प्रतिमा खराब करण्यासाठी टूलकिटचा वापर करण्यात आला. आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एका पेज बद्दल लिहित असे म्हटले की.'मित्रो महारोगाच्या दरम्यान गरजूंना मदत करण्यासाठी काँग्रेसचे टूलकिट पहा. तुम्ही स्वत: काँग्रेस पक्षाचा अजेंडा वाचा'.