Tongue Surgery Instead of Fingers: बोटांवरील उपचारांसाठी जिभेवर शस्त्रक्रिया; कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा, 4 वर्षांच्या मुलगी पीडिता
Surgery | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (Kozhikode Medical College Hospital) वैद्यकीय निष्काळजीपणाची (Medical Negligence) आणखी एक चिंताजनक घटना समोर आली आहे. केवळ चिंताच नव्हे तर घडल्या प्रकारामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. संतापही व्यक्त केला जातो आहे. एका चार वर्षाच्या मुलीवर बोटांची शस्त्रक्रिया करायची होती. मात्र, झापड लावलेल्या डॉक्टरांनी नजरचुकीने चक्क मुलीच्या जीभेवर शस्त्रक्रिया (Tongue Surgery Instead of Fingers) केली. प्रकरणाची वाच्यता झाल्यानंतर केरळ आरोग्य प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणाची चौकशीही सुरु झाली आहे. जाणून घ्या नेमके घडले तरी काय?

हाताऐवजी तोंडाला प्लास्टर

पीडित मुलाच्या आईने सांगितले की, कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये एका चार वर्षांच्या मुलीवर एका हाताचे सहावे बोट काढण्यासाठी किरकोळ शस्त्रक्रिया करायची होती. त्यासाठी तिला रुग्णालयात आणण्यात आले होते. हॉस्पीटलमधील स्टाफने मुलीला निश्चित वेळेनुसार ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. पण, बाहेर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला. मुलीच्या हाता ऐवजी तोंडाला प्लास्टर करण्यात आले होते. जे पाहून पालकांसह सर्वांनाच धक्का बसला. हाताचे अतिरिक्त बोट मात्र तसेच होते आणि तिच्या जिभेवर शस्त्रक्रिया झाली होती. (हेही वाचा, Chhattisgarh: स्वत:ची जीभ कापून देवाला अर्पण, छत्तीसगडमधील तरुणाचे धक्कादायक कृत्य)

प्लास्टर पाहून सर्वांन आश्चर्याचा धक्का

पीडित मुलीच्या आईने पुढे सांगितले की, वैद्यकीय निष्काळजीपणाबद्दल आम्हाला धक्का बसला आहे. आम्ही जेव्हा मुलीच्या अतिरिक्त बोटाबाब समस्या घेऊन डॉक्टरांकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की, घाबरण्याचे कारण नाही. एका किरकोळ शस्त्रक्रियेद्वारे हे बोट काढून टाकले जाऊ शकते. त्यासाठी खर्चही फार येणार नाही. डॉक्टरांवर विश्वास ठेऊन आम्ही मुलीच्या हतावरील शस्त्रक्रियेसाठी तयार झालो. आम्हाला दिलेल्या वेळेनुसार आम्ही हॉस्पीटलमध्ये पोहोचलो. डॉक्टरांनीही तिला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात घेतले. पण, मुलगी जेव्हा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आली तेव्हा तिच्या तोंडाला प्लास्टर गुंडाळले होते. मुलीचे तोंड प्लास्टरमध्ये असल्याचे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. आम्हाला काय झाले ते कळले नाही आणि नंतर जेव्हा आम्ही तिचा हात तपासला, सहावे बोट अजूनही तिथेच होते. (हेही वाचा, Medical Negligence: केमोथेरपीनंतर महिलेचे संपूर्ण केस गळाले, त्वचाही खराब झाली; त्यानंतर डॉक्टरांचा खुलासा- तिला कर्करोग झालाच नव्हता)

नर्स लागली हसायला

आम्ही जेव्हा घडल्या प्रकाराबद्दल रिसेप्शन काऊंटरवर जाऊन तक्रार केली तेव्हा आमची तक्रार पाहून नर्स हसू लागली. तिच्याकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाला. मात्र, नंतर डॉक्टारांनी आपली चूक मान्य करुन आमची माफी मागितलीआणि योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले. शिवाय शस्त्रक्रियाही पुन्हा केली जाईल असे सांगितले. दरम्यान,धिकाऱ्यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून वैद्यकीय सेवेत झालेल्या चुकीबद्दल चौकशी सुरु केली आहे. धक्कादायक म्हणजे या रुग्णालयात या आधीही असाच एक प्रकार घडला होता. ज्यामध्ये एका महीलेची बाळंतपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिच्या पोटात डॉक्टर चुकुन कात्री विसरले होते, असा दावा करण्यात आला होता.