TISS (PC - Wikipedia)

Tata Institute of Social Sciences मध्ये 100 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. आज 30 जून दिवशी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपल्याचं सांगून त्यांना नारळ देण्यात आला आहे. 28 जूनला त्यांना टर्मिनेशन लेटर देऊन ही बाब सांगण्यात आली आहे. त्यामुळे देशभर TISS campuses मध्ये भीतीचं वातावरण आहे. या कपातीची झळ मुंबई, तुळजापूर, हैदराबाद आणि गुवाहाटी च्या कॅम्पस मध्ये कर्मचार्‍यांना लागली आहे. 100 हून अधिक कर्मचाऱ्यांमध्ये 55 शिक्षक आणि 60 शिक्षकेतर कर्मचारी आहेत, असे द इंडियन एक्स्प्रेस च्या वृत्तामध्ये सांगण्यात आले आहे.

शिक्षकांपैकी, वृत्तपत्राने मुंबई कॅम्पसमधून 20, हैदराबादमधून 15, गुवाहाटीमधून 14 आणि तुळजापूरमधून 6 जणांना काढून टाकल्याचे वृत्त दिले आहे. हे सर्व कंत्राटी कर्मचारी होते ज्यांना टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून त्यांच्या पगारासाठी निधी उपलब्ध नसल्याचं सांगत कामावरून काढून टाकलं आहे. TISS मधील कायमस्वरूपी शिक्षकांवर परिणाम झालेला नाही कारण ते तत्कालीन केंद्र सरकारच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) वेतनावर आहेत.

TISS ही एक डीम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि त्याला केंद्र सरकारकडून निधी दिला जातो. गेल्या वर्षी, सरकारने UGC चे नियम बदलले की ते सर्व डीम्ड युनिव्हर्सिटीजच्या प्रमुखांना त्यांच्या स्वतःच्या नियामक मंडळांऐवजी 50 टक्क्यांपेक्षा जास्त निधी देतील. यामध्ये TISS चाही समावेश होता. Yes Bank Layoffs: 'येस बॅंक' मधून 'Cost-Cutting' च्या कारणाखाली 500 जणांना नारळ .

TISS ने टाटा ट्रस्ट्सकडून निधी जारी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु ते होऊ शकले नाही, असे सांगत आता कर्मचाऱ्यांना काढावं लागत असल्याचं ईमेलमध्ये म्हटले आहे.