Road Accident (Photo Credits: File photo)

रस्त्यांवर अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी त्यांचे बहुधा व्हिडिओ काढून सोशल मीडियात व्हायरल केले जातात. परंतु आता अपघात झाल्यानंतर मदत न करण्याऐवजी व्हिडिओ काढल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबद्दल पोलिसांनी प्रयत्न करण्यास सुरुवात करण्यात आली असून अशा व्हिडिओ काढणाऱ्या बघ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

तसेच अपघात झालेल्या ठिकाणी सीसीटीव्ही असल्यास त्याचे फुटेजसुद्धा पोलिसांकडून तपासले जाणार आहेत. त्यावेळी जर व्हिडिओ काढणारा व्यक्ती दिसून आल्यास त्याची ओळख पटवून त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान अशा अपघातात काही वेळेस रस्त्यांवरुन जाणारे लोक अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी बघ्यांची भुमिका घेतात. त्यामुळे अपघात झालेल्या व्यक्तीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटना यापू्र्वी घडल्या आहेत.(धक्कादायक! एका वर्षात बँकांची तब्बल 71,500 कोटींची फसवणूक, RBI ची माहिती; नीरव मोदी आणि विजय माल्ल्या यांची नावे आघाडीवर)

तर सध्या ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेसवे येथे होणारे अपघात बऱ्याच वेळा अपघात होतात. त्यावेळी तेथील लोक फक्त बघ्यांची भुमिका घेतात त्यामुळे पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.