The Elephant Whisperers | (File Image)

द एलीफेंट व्हिस्परर (Elephant Whisperer) या माहितीपटास ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांची क्रेझही लोकांमध्ये चांगलीच आहे. याची प्रचिती इंडिगो (IndiGo Flight) कंपनीच्या विमानातही पाहायला मिळाली. या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात पाहायला मिळते की, चित्रपटातील कलाकार Bomman आणि Bellie यांचे विमानाच्या पायलट आणि प्रवाशांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. द एलीफेंट व्हिस्परर ने अकादमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जिंकल्याची घोषणा 12 मार्च 2023 रोजी करण्यात आली. 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ही घोषणा झाली. द एलीफेंट व्हिस्परर हा माहितीपट तामिळनाडूमधील अनाथ हत्तींच्या बछड्यांचे संगोपन करणाऱ्या बोमन आणि बेली यांच्यावरील जिवनावर आधारीत आहे.

तामिळनाडू सरकारच्या पर्यावरण हवामान बदल आणि वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर या जोडप्याचा या व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात पाहायला मिळते की, फ्लाइटच्या कॅप्टनने त्यांच्या ऑस्कर विजेतेपदाची घोषणा केली आणि त्यांना अभिवादन स्वीकारण्यासाठी उभे राहण्याची विनंती केली. ज्यानंतर क्रू मेंबर्स आणि सहप्रवाशांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. हात जोडून त्यांना नमस्कारही केला. (हेही वाचा, The Elephant Whisperers: ऑस्कर जिंकल्यानंतर थेप्पाकडू एलिफंट कॅम्प बनले पर्यटकांचे आकर्षण)

ट्विट

द एलिफंट व्हिस्परर्सने95 व्या अकादमी अवॉर्ड्समध्ये डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट श्रेणीमध्ये पुरस्कार विजेता माहितीपट बनून इतिहास रचला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या कामगिरीबद्दल कलाकार बोमन आणि बेली यांचा सत्कार 15 मार्च रोजी केला आणि त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचा धनादेश, एक ढाल आणि शाल देऊन त्यांचा सन्मान केला. दरम्यान, अलीकडेच एमके स्टॅलिन यांनी कार्तिकीला एक कोटी रुपयांचा चेक दिला. सचिवालयात, त्याने तिला स्मृतीचिन्ह, शाल आणि कौतुकाचे प्रमाणपत्र दिले आणि तिला एक कोटी रुपयांचा धनादेश, सरकारी प्रोत्साहन म्हणून दिला. ऑस्कर पुरस्कार जिंकल्याबद्दल त्यांनी तिचे अभिनंदन केले.