प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

Telangana Assembly Elections 2018: मतदानाला अवघे काही तास उरले असताना तेलंगणातून तीन कोटी रुपये पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. या प्रकरणात आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही रक्कम कर्नाटकातून आल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. पण याबद्दलची नेमकी माहिती मिळालेली नाही.

मात्र ही रक्कम मतदारांना वाटण्यासाठी आली असणार, असा संशय व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत तेलंगणातून याप्रकारे 119 मतदारसंघातून 120 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणूकीच्या काळात ही रक्कम आल्याने ती मतदारांना वाटण्यासाठी किंवा निवडणूकीवर खर्च करण्यासाठी आली असल्याचा अंदाज आहे. हे ही वाचा: तेलंगणामध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार?

यापूर्वी मध्य प्रदेशातील मतदान पार पडले. तिथे 230 मतदारसंघ असून निवडणूक काळात मध्यप्रदेशातून 29 कोटी बेहिशोबी रक्कम जप्त करण्यात आली होती. तर राजस्थानमधून आतापर्यंत 35 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. फक्त पैसा नाही तर मतदरांना साड्या, शर्ट-पँडचे कापड, भांडी, धान्य याचेही वाटप केले जात आहे. इतकंच नाही तर मतदारांना चक्क दारुचा पुरवठाही केला जात आहे.

राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणूकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान प्रक्रीया सुरळीत पार पडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजस्थानमध्ये 199 जागांसाठी 2274 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.