
जर तुम्ही देशातील पहिल्या प्रायव्हेट ट्रेन तेजस एक्सप्रेसने (Tejas Express) प्रवास करण्याचा विचार करत असल्यास तुमची थोडी निराशा होऊ शकते. कारण तेजस एक्सप्रेस देशातील पहिली अशी एक्सप्रेस आहे, जी उशिराने धावल्यास त्याच्या प्रवाशांना नुकसान भरपाई देते. मात्र या ट्रेनचे संचालन करणाऱ्या आयआरसीटीसीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, कोणत्याही चुकीच्या कारणामुळे ट्रेन उशिराने धावल्यास त्याची नुकसान भरपाई देणार नाही आहे.
तेजस एक्सप्रेस नुकसान भरपाई न देण्यामागे काही कारण आहे. ते म्हणजे जर नैसर्गिक आपत्तीमुळे तेजस एक्स्प्रेस उशीर झाल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई दिली जाणार नाही. आयआरसीटीसीने म्हटले आहे की नैसर्गिक आपत्ती 'अॅक्ट ऑफ गॉड' अंतर्गत येते. अशा परिस्थितीत दैवी आपत्तीमुळे तेजस एक्स्प्रेसला उशीर झाल्यास नुकसान भरपाई देणार नाहीत. हिवाळ्याच्या हंगामात धुक्यामुळे तेजस एक्स्प्रेस उशीर झाल्यास प्रवाशांना त्याचा लाभ मिळणार नाही कारण आयआरसीटीसीनुसार धुक्याला 'अॅक्ट ऑफ गॉड' मानले जाणार आहे.(सणासुदीच्या काळात ख्रिसमसपर्यंत धावणार 200 जादा गाड्या; पहिल्यांदा उपलब्ध होणार 'या' सुविधा- रेल्वेचा निर्णय)
गेल्या 19 ऑक्टोबरला तेजस एक्सप्रेस पहिल्यांदाच 3 तास उशिराने सोडण्यात आली होती. त्यानंतर प्रवाशांना नुकसान भरपाई म्हणून 1 लाख 62 हजार रुपये द्यावे लागले होते. आयआरसीटीसीने एकूण 950 प्रवाशांच्या नुकसान भरपाईचे पैसे भरले होते. भारतीय रेल्वेच्या इतिहासात ही घटना पहिल्यांदाच घडली होती.