टॅक्सी चालकाचा प्रताप; खोट्या कंपनीद्वारे भारतभर 20 लाख लोकांना 14,800 कोटी रुपयांचा चूना; तब्बल 40 हजार पानांचे आरोपपत्र दाखल
आदर्श क्रेडिट को. ऑपरेटिव्ह सोसायटी (संग्रहित संपादित प्रतिमा)

सहकार क्षेत्रात, विशेष मोहीम कार्यसंघाने (SOG) देशातील सर्वात मोठ्या आदर्श क्रेडिट को. ऑपरेटिव्ह सोसायटी (Adarsh Credit Cooperative Society) घोटाळ्याबाबत  40 हजार पृष्ठांचे आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक सत्ये समोर आली आहेत. हा घोटाळा कसा झाला आणि त्यामागे कोणाची भूमिका होती यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. सिराही सारख्या छोट्या  शहरातील वीरेंद्र मोदी (Virendra Modi), जो टॅक्सी ड्रायव्हर आणि कॅसेट रेकॉर्डिंग करायचा, त्याने आपले भाऊ मुकेश आणि भरत यांच्यासह 28 राज्यांमध्ये राज्यात आदर्श सोसायटीच्या 806 शाखा उघडल्या.

यामध्ये त्याने आपले घरातील नोकरदार व चालकासह कुटुंबातील 11 जणांना संचालक केले. या घोटाळ्यात 20 लाख लोकांकडून तब्बल 14,800 कोटी रुपये उकळण्यात आले होते. गुंतवणूकदारांचे 12,414  कोटी तर नातेवाईक व नोकरदारांनी बनावट कंपन्यांना वाटप केले. एसओजीने 6 महिन्यांच्या चौकशीनंतर मोदी कुटुंबातील 11 लोकांसह इतर 3 लोकांना अटक केली.

(हेही वाचा: कडकनाथ कोंबडी घोटाळा: पाटण येथे गुन्हे दाखल; राज्यमंत्री सदाभाऊ खोतांचा मुलगा संशयित नाही, पोलिसांचा यू टर्न)

एसओजीने आरोपपत्रात असा दावा केला आहे की, मोदी बांधवांनी इटालियन ठग चार्ल्स पोन्झी यांच्यासारखी फसवणूक केली. 1920 च्या दशकात अमेरिका आणि कॅनडामध्ये बनावट कंपन्या सुरू करून पोंझी यांने 20 दशलक्ष डॉलर्सचा घोटाळा केल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे. 1999 मध्ये वीरेंद्र आणि मुकेश यांनी सिरोही येथे पहिली शाखा उघडली. 4 वर्षात राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश येथे 309 शाखा उघडल्या. 2012 पर्यंत 806 शाखा झाल्या होत्या. नोटबंदीमध्ये 223 कोटी रु. पुनर्स्थित करण्यात आले. बनावट फर्ममधून शेकडो कंपन्या उघडल्या. डिसेंबर 2018 मध्ये मोदी आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.