Bulandshahr Violence: बुलंदशहर हिंसाचारात पोलीस अधिकारी सुबोध कुमार (Subodh Kumar Singh)यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याचा शोध लागला आहे. प्रशांत नट (Prashant Nat) असे या मारेकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. बुलंदशहर एसएसपी प्राभाकर चौधरी यांनीही प्रशांत नट याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत प्रशांत नट याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते. तसेच, रिवॉल्वर चोरणारा व्यक्ती जॉनी याचीही ओळक पटली आहे. मात्र, अद्याप तो पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस त्याच्या मागावर आहेत.
पोलीस सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस अधिकारी सुबोधकुमार यांचे रिवॉल्वर जॉनी यानेच चोरली होती. त्यानंत याच रिवॉल्वरमधून प्रशांत नट यांने सुबोध कुमार यांना गोळी मारली. या प्रकरणात दोन व्हिडिओ हाती लागले होते. ज्यात प्रशांत नट आणि जॉनी एकत्र पाहायला मिळाले होते. प्रशांत नट आणि जॉनी या दोघांना पोलीस अधिकारी सुबोध कुमार यांची हत्या केल्याप्रकरणी एकत्रित आरोपी करण्यात आले आहे. तसेच, योगेश राज याच्यावर हिंचाचार भडकवण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप ठेवत या हिसांचारातील प्रमुख आरोपी करण्यात आले आहे. (हेही वाचा, लोकसभेच्या ८० जागांसाठी ‘मुज्जफरनगर’,‘कैराना’प्रमाणेच ‘बुलंदशहर’ घडवून आणले जात आहे का?)
दरम्यान, कथीत गोहत्येवरुन उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे 3 डिसेंबर रोजी हिंसाचार घडला होता. या हिंसाचारात पोलीस इन्पेक्टर सुबोध कुमार यांची हत्या करण्यात आली होती. यात हिंसक जमावातील एका युवकाचा मृत्यूही झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी जीतू फौजी याला ताब्यात घेण्यात आले होते. जीतू हा घटना घडली त्या दिवशी पोलीस स्टेशनसमोर उपस्थित होता. उत्तर प्रदेशचे एसटीएफचे एसएसपी यांनी म्हटले आहे की, आरोपी जवान जीतू याने बुलंदशहर हिंसाचारादरम्यान हिंसक जमावात सहभागी झाल्याचा आरोप मान्य केला होता.