Tata Group कडून केले जाणार आता Air India चे परिचालन, सर्वाधिक रक्कम लावत जिंकली बोली
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

शासकीय विमानसेवा एअर इंडियाचे  (Air India) टाटा ग्रुपकडून (Tata Group) परिचालन केले जाणार आहे. सुत्रांच्या मते टाटा सन्स (Tata Sons) यांनी एअर इंडियाच्या खरेदीसाठी सर्वाधिक रक्कम लावत बोली जिंकली आहे. तर बोलीच्या प्रक्रियेत मोठे उद्योजक म्हणून टाट सन्स आणि स्पाइजजेट होते. पण सुत्रांनी म्हटले की, टाटा यांनी बोली जिंकली आहे. एअर इंडियाची खरेदी करण्यासाी टाटा सन्स यांच्यासह काही कंपन्यांचा समावेश होता. पण टाटा ग्रुपच्या टाटा सन्स यांनी सर्वाधिक बोली लावत एअर इंडिया आपल्याकडे घेतली आहे. सध्या टाटा समूहची एअर एशिया आणि विस्तारा मध्ये भागीदारी आहे. स्पाइसजेट कडून अजय सिंह यांनी एअर इंडियासाठी बोली लावली होती.

याआधी या कंपनीचे नाव टाटा एअरलाइन्सच होते. जे आर डी टाटा यांनी 1932 मध्ये टाटा एअर सर्विसेज सुरु केली होती. त्यानंतर टाटा एअरलाइन्स झाली. 29 जुलै 1946 रोजी ती पब्लिक लिमिडेट कंपनी झाली. 1953 मध्ये सरकारने टाटा एअरलाइन्सला विकत घेतले आणि ती सरकारी कंपनी बनली.(Auto Debit साठी आजपासून नवे नियम, तुमच्या परवानगी शिवाय पैसे कापले जाणार नाही)

Tweet:

सरकारच्या कर्जामध्ये अडकलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी जानेवारी 2020 पासून गुंतवणूक प्रक्रिया सुरु झाली होती. यादरम्यान, देशात कोरोना व्हायरसची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे ही प्रक्रिया 1 वर्षापर्यंत स्थगित झाली. यंदाच्या वर्षात एप्रिलमध्ये सरकारने इच्छुक कंपन्यांनी एअर इंडियाला खरेदी करण्यासाठी आर्थिक बोली लावली. यासाठी 15 सप्टेंबर ही अंतिम तारीख ठेवली गेली होती.

नुकत्याच केंद्रीय उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केले की, आर्थिक बोली लावण्यासाठी अंतिम तारखेत वाढ केली जाणार नाही. त्यानंतर बुधवारी संध्याकाळ पर्यंत सरकारकडे काही कंपन्यांची आर्थिक बोली आली होती. सरकारने यापूर्वी 2018 मध्ये एअर इंडियाचा 76 टक्के भाग विक्री करण्याचा विचार केला होता. पण तो अयशस्वी ठरला. त्यानंतर सरकारने या वर्षात कंपनीचा 100 टक्के भाग विक्री करण्याची घोषणा केली.