Tamil Nadu: तमिळनाडूच्या आरोग्य विभागाने गर्भवती महिलांचे आकडे जाहीर नुकतेच जाहीर केले आहेत. त्यामध्ये धक्कादायक गोष्ट अशी की, गेल्या 9 महिन्यांमध्ये (एप्रिल ते डिसेंबर) 20 हजार अल्पवयीन मुली गर्भवती झाल्याचा खुलासा झाला आहे.
राष्ट्रीय स्वास्थ मिशन याचे निर्देशक आणि मातृ व शिशु आरोग्याचे आयुक्त दरेज अहमद यांनी अल्पवयीन मुली गर्भवती राहिल्याचा खुलासा केला आहे. या मुली 16 ते 18 वर्षामधील असून त्यांचा बालविवाह करण्यात आला आहे. तसेच अल्पवयात गर्भवती राहिल्याने मुलीच्या आयुष्याला धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त वर्तविली जाते. तरीही या अल्पवयीन मुलींना त्यांच्या बाळांना जन्म द्यायचा होता. मात्र गर्भपात करण्यासाठी सुद्धा त्या तयार नसल्याचे सांगितले जात आहे.
समाज कल्याण विभाग आणि पोषण मिशन विभागाकडून जाहीर केलेल्या यादीमध्ये 2008 ते 2018 पर्यंत फक्त 6,695 बालविवाह झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र काहींनी जाहीर केलेल्या यादीवर टीका करत ही खोटी असल्याचे म्हटले आहे. तर इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ प्यापुलेशन यांनी केलेल्या अभ्यासानुसार लहान मुलींमध्ये सेक्शुअल हेल्थ या संबंधित जागृकता आणि शिक्षण देणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.