तामिळनाडूमध्ये पोंगल सणाच्या सुट्ट्यांच्या आधी, राज्य सरकार त्यांच्या कोणत्याही मागण्यांचा विचार करत नसल्याचा आरोप करत, राज्यातील परिवहन कामगार संघटनांनी मंगळवारपासून अनिश्चित काळासाठी बस संपाची घोषणा केली आहे. प्रमुख संघटनांशी संलग्न कामगार - सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीआयटीयू), ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (एआयटीयूसी), आणि अण्णा थोझीर संगा पेरावई (एटीएसपी) या संपाचा भाग आहेत. वेतनवाढीसाठी 15 व्या वेतन सुधारणा करारावर स्वाक्षरी करणे, बस चालक आणि वाहक पदांमधील रिक्त पदे भरणे आणि सेवानिवृत्त कामगारांना दरमहा 6000 रुपये महागाई भत्ता (डीए) जारी करणे यासह अनेक मागण्या संघटनांनी मांडल्या होत्या. (हेही वाचा - Hit-and-Run Law: नवीन हिट-अँड-रन कायद्याबाबत सरकारने आश्वासनानंतर मालवाहतूक सुरळीतपणे सुरू)

पाहा पोस्ट -

तामिळनाडूचे परिवहन मंत्री एसएस शिवशंकर यांनी या संपाला 'राजकीय खेळी' असल्याचे म्हटले आहे. त्यांनी चेन्नई कोयंबेडू बसस्थानकाची पाहणी केली आणि विविध परिवहन संघटनांनी आज संप पुकारला असतानाही वाहतूक सुरळीत चालण्यासाठी परिवहन अधिकाऱ्यांना सल्ला दिला.