कामाच्या ठिकाणी पारंपारिक कपडे घालण्याचे तामिळनाडू सरकारचे फर्मान
Tamil Nadu CM Edappadi K. Palaniswami ( (Photo Credits: PTI)

सरकारी पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी केवळ पारंपारिक पोशाख परिधान करावा, असा फर्मान तामिळनाडू सरकारने काढले आहे. या संदर्भात तामिळनाडू सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी परिपत्रकाद्वारे आदेश काढला आहे. कामावर जाताना महिला कर्मचाऱ्यांनी साडी, सलवार कमीज किंवा चुडीदार दुपट्ट्यासहीत असे कपडे परिधान करावे. तर पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, फॉर्मल पॅन्ट, वेश्टी म्हणजेच लुंगी असे पारंपारिक पोशाख परिधान करावे, असे परिपत्रकात म्हटले आहे.

ANI ट्विट:

तामिळनाडू सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पेहरावावर बंधनं येत आहेत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर कर्मचाऱ्यांकडून टीका होत आहे. हा निर्णय योग्य नसून सरकारचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांना ड्रेसकोडची सक्ती नाही. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांवर लादण्यात आलेला पेहरावाचा हा नियम म्हणजे दुटप्पी भूमिका असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.