Tamil Nadu: पत्नीच्या चारित्र्यावर संशय; बापाने दोन्ही दोन मुलांना फासाला लटकवून स्वतः केली आत्महत्या, नातेवाईकांना पाठवला व्हिडीओ
Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

तामिळनाडूच्या (Tamil Nadu) सालेममधून (Salem) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध (Extramarital Affair) आहे, या संशयावरून एका व्यक्तीने आपल्या दोन्ही मुलांना फासाला लटकावले. यामध्ये मुलांचा मृत्यू झाला त्यानंतर या व्यक्तीने आत्महत्या केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलांना मारल्यानंतर त्याने त्याचा व्हिडिओही बनवला आणि तो नातेवाईकांना पाठवला. सध्या पोलीस याबाबतचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय मुरुगनचे मुरुगेश्वरीशी लग्न झाले होते. दोघांनाही दोन मुले होती. 9 वर्षांचा मुलगा आणि 5 वर्षांची मुलगी.

गेली 10 वर्षे मुरुगन एका ढाब्यावर काम करत होता. ढाब्याशेजारीच त्याचे घर होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काम करत असताना मुरगुनला भाजले होते. त्यानंतर तो सुमारे 10 दिवस घरातच होता. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्यास सांगितले होते. या दरम्यान, घरात राहत असताना त्याला संशय आला की त्याच्या पत्नीचे इतर कोणासोबत अफेअर आहे. ही गोष्ट सहन न झाल्याने त्याने हे पाऊल उचलले.

इंग्रजी वृत्तपत्र हिंदूनुसार, मुरुगन शनिवारी संध्याकाळी मुलांसह घरातून बाहेर पडला मात्र संध्याकाळी तो परतला नाही. काही तासांनंतर त्याने त्याची पत्नी मुरुगेश्वरी आणि इतर नातेवाईकांना एक व्हिडिओ पाठवला. व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. या व्हिडिओमध्ये त्याच्या दोन्ही मुलांचे मृतदेह होते. व्हिडिओ पाठवल्यानंतर मुरुगनने कथितरित्या आत्महत्या केली. यानंतर, मुरुगेश्वरी आणि ढाबा मालकाने रविवारी पहाटे शंकरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. (हेही वाचा: Bihar Shocker: ग्राम पंचायतीच्या सुनावणीदरम्यान 2 जणांची गोळ्या घालून हत्या, बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील घटना)

पोलिसांनी रविवारी संध्याकाळी शंकरीजवळील शेतातून मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. दरम्यान याआधी बेळगावमध्येही पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेता एका तरुणाने आपल्या अडीच वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची घटना समोर आली होती. हा मुलगा आपला नाही, असे समजून तरुणाने चिमुकल्याला स्वीकार केला नव्हता.