Tamil Nadu: तामिळनाडूमध्ये रथयात्रेत विजेचा धक्का, दोन मुलांसह 11 जण ठार
Thanjavur | (Photo Credit - Twitter/ANI)

तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील तंजावूर (Thanjavur) जिल्ह्यातील एका मंदिरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. या मंदिरात यात्रेनिमित्त बुधवारी (27 एप्रिल) सकाळी काढण्यात आलेल्या एका रथयात्रेत विद्युत धक्का बसून दोन लहान चिमुकल्यांसह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, रथयात्रेत हे लोक जेव्हा पालखीसोबत होते तेव्हा ही घटना घडली. पालखी कलीमेडू येथील अप्पर मंदिरात एक हाय ट्रान्समिशन लाईन संपर्कात आला. अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, मंदिराची पालखी वळनावरुन जात असताना ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्याने ही धक्कादायक घटना घडली.

स्थानिक अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, या दुर्घटनेत दोन लहान मुले ठार झाली आहेत. तर 11 जण ठारझाले आहेत. दरम्यान गंभीर जखमी असलेल्या 15 जणांना तंजावूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. तिरुचिरापल्ली येथील मध्य क्षेत्र परिसराचे महानिरीक्षक व्ही बालकृष्णन यांनी या दुर्घटनेची प्रशासनाने दखल घेतली असून चौकशी सुरु केल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, तमिळनाडूतील तंजावर येथील एका व्यक्तीच्या बँक लॉकरमधून पोलिसांनी 500 कोटीचे 'शिवलिंग' केले जप्त)

ट्विट

तामिळनाडू येथे झालेल्या घटनेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन दु:ख व्यक्त केले आहे. पीएमओद्वारे ट्वीट करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तामिळनाडूच्या तंजावूरमध्ये झालेल्या दुर्घटनेबद्दल मला तीव्र दु:ख व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लोख लवकर बरे होतील अशी माझी प्रार्थना.

ट्विट

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओही पुढे आला आहे. ज्यात स्पष्टपणे दिसते आहे की, एका ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्याने रथ पूर्णपणे नष्ट झाला. तामिळनाडूतील वार्षिक रथ उत्सवात भक्त मोठ्या पद्धतीने सहभागी होतात.